vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भायखळा विधानसभा मतदार संघात “पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तुंच्या भरमसाठ दरवाढी विरोधात जनआंदोलन”

भायखळा विधानसभा मतदार संघात “पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तुंच्या भरमसाठ दरवाढी विरोधात जनआंदोलन”

मुंबई : प्रतिनिधी. अख‍िल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज भायखळा विधानसभा मतदार संघातील ब्लॉक काँग्रेस कमिटी क्र.208 च्या वतीने “पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तुंच्या भरमसाठ दरवाढी विरोधात” मा.अध्यक्ष म्हाडा(मंत्री दर्जा) व मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा.आमदार श्री.मधु अण्णा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोडपदेव-फेरबंदर येथे जनआंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल व जिवनावश्यक वस्तुंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य जनतेने आता जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने तातडीने पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तुंच्या किंमती कमी कराव्यात व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनाद्वारे केली. या आंदोलनात काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, युवानेते अनिकेत घाडीगांवकर, राजू घाडीगांवकर, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आंग्रे, समीर चव्हाण, मधु साळुंखे, संदिप कांडके, ॲङ वैभव म्हस्के व अन्य ज्येष्ठ काँग्रेस पदाध‍िकारी-कार्यकर्ते व विभागातील नागरिकांनी सहभाग घेतला. भायखळा काँग्रेसच्यावतीने सदर जनआंदोलन संपूर्ण भायखळा विधानसभा मतदार संघात 17 जुलै पर्यंत राबविण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

अग्निवीर’ भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनाआवश्यक सुविधा द्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांचा आढावा-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

माहिती तंत्रज्ञाना’ला आव्हान; पीटीआय कोर्टात, विचारस्वातंत्र्याच्या मुलभूत हक्काचीही गळचेपी होणार.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार- मंत्री उदय सामंत

सर्व जाती धर्मियांना एकत्र आणणे हेच डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचे मिशन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* *उत्तर प्रदेशात आगामी काळात रिपब्लिकन पक्ष बसपा ची जागा घेईल* 

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी सुटी जाहीर

vishwatmaklokswamivarta