vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई येथील धारावी विभागातील आमदार मंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या; हिंगोली दौऱ्यात कारला भरधाव टेम्पोची धडक…

मुंबई येथील  धारावी विभागातील आमदार मंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या; हिंगोली दौऱ्यात कारला भरधाव टेम्पोची धडक…

मंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या; हिंगोली दौऱ्यात कारला भरधाव टेम्पोची धडक

हिंगोली : धारावी विभागातील आमदार शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली  जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकअप टेम्पोची धडक बसल्याची घटना शहरातील पिपल्स बँकेजवळ १० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड ९ जुलैपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती, कोरोना स्थितीचा आढावा व कृषी विभागाची आढावा बैठक झाली.

१० जुलै रोजी सकाळी आकरा वाजता शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. ताफा पिपल्स बँकेजवळ आला असता याच वेळी मोंढ्यातून भरधाव वेगाने एक पिकअप टेम्पो मुख्य रस्तावर येत होता. काही कळायच्या आत पालकमंत्री गायकवाड यांच्या वाहनावर टेम्पो धडकला. प्रसंगावधान राखून पालकमंत्र्यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवली. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग किंचित
घासल्या गेला. सुदैवाने अपघातात कोणालाही इजा झाली नाही. घटनेनंतर पोलिसांनी पीकअप टेम्पो चालकास ताब्यात घेतले असून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी रामलिला मैदानावर पाहणी केली. दरम्यान, दुपारी २ वाजेपर्यंत हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पिक अप वाहनचालकाविरूद्ध गुन्हा नोंद झाला नव्हता.

संबंधित पोस्ट

डॉ. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिलेला नसतानाही,सनातनला दोषी ठरवणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! – सनातन संस्था…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

vishwatmaklokswamivarta

तळागाळातील लोकांना कायद्याच्या माहितीसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आवश्यक – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रजिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक जनजागृती मोहीम

देशात शरिया कायदा नाही; हिंदूंना टार्गेट केल्यास, जशास तसं उत्तर, भाजपा आमदार नितेश राणे यांचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना

vishwatmaklokswamivarta

६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका उपलब्ध-२८ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांचे आवाहन