vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करणार- उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबईतील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करणार- उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी:- मुंबईतील शासकीय जागांवरील अनधिकृत बांधकामबाबत उचित कारवाई करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात येत असल्याची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.सदस्य योगेश सागर यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य ज्योती गायकवाड, अमीन पटेल, रईस शेख, मंदा म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले, सदस्य योगेश सागर यांनी मुंबईतील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामांची माहिती सभागृहात सादर केली आहे. यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली जात असून या समितीमध्ये मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई शहर व मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी यांचाही समावेश राहणार आहे. या समितीकडून दर तीन महिन्याला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेतला जाईल.

शासकीय जागेवर जाणीवपूर्वक केलेल्या अधिकृत बांधकामावर कारवाई होणे आवश्यक असून यासंदर्भात समिती उचित कार्यवाही करेल. ज्या कार्यक्षेत्रातील हे बांधकाम असेल त्या ठिकाणी समिती तेथील लोकप्रतिनिधीला निमंत्रक म्हणूनही बोलावतील असेही त्यांनी उत्तरात सांगितले.

००००

 

संबंधित पोस्ट

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क- हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

vishwatmaklokswamivarta

नविन रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

दहा डिसेंबर सकाळी एक वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मेगा ब्लॉक-मध्य रेल्वेने कल्याण आणि लोणावळा स्थानकांदरम्यान आवश्यक पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी एक विशेष अभियांत्रिकी ब्लॉक जाहीर

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष स्थापन