vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सत्कार नामांतरलढ्यातील विराचा….**रिपब्लिकन ज्येष्ठ नेते डी एम चव्हाण यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज  सत्कार समारंभ* 

*सत्कार नामांतरलढ्यातील विराचा….**रिपब्लिकन ज्येष्ठ नेते डी एम चव्हाण यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज  सत्कार समारंभ*

मुंबई प्रतिनिधी ~ रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि भारतीय दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत काम करणारे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते नामांतर लढ्यातील वीर योद्धे नेतृत्व डी एम चव्हाण यांचा आज सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी

अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य सत्कार समारंभ घाटकोपर पूर्व झवेरबेन हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.या सत्कार सोहळ्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सत्कारमूर्ती डी एम चव्हाण हे सबंध रिपब्लिकन चळवळीत मामा म्हणून लोकप्रिय आहेत.त्यांचा चाहता वर्ग संबंध महाराष्ट्रात विखुरला असून मागील 50 वर्षांपासून डी एम चव्हाण मामा हे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पाठीशी एकनिष्ठ उभे राहिलेले आहेत.निष्ठेने त्यांनी ना. रामदास आठवले यांना खंबीर साथ दिली असून राज्यभर ते सतत ना. रामदास आठवले यांच्या सोबत दौरे करीत राहिले आहेत.मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या ऐतिहासिक ठरलेल्या नामांतर लढ्यात डी एम चव्हाण मामा यांनी ना.रामदास आठवले यांना साथ देत या नामांतर लढ्यात योगदान दिले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डी एम चव्हाण मामा यांचा 75 वा वाढदिवस अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ म्हणून आयोजित करण्यात आला आहे. आज सोमवार दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन सभागृह येथे नामांतरवीर डी एम चव्हाण मामा यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यास मोठ्या संख्येने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

 ज्येष्ठ नेते डी एम चव्हाण मामा यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभास केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले; सौ सीमाताई आठवले;कुमार जीत आठवले; स्थानिक आमदार पराग शहा; आमदार मिहिर कोटेचा ; खासदार चंद्रकांत हांडोरे; खासदार संजय पाटील; माजी खासदार मनोज कोटक; लोकप्रिय गायक आनंद शिंदे; अविनाश महातेकर;एम एस नंदा;गौतम सोनवणे सिद्धार्थ कासारे; कृष्णमिलन शुक्ला; काकासाहेब खंबाळकर; बाळासाहेब गरुड; विवेक पवार; अजित रणदिवे;तालुका अध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संबंधित पोस्ट

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘सुकन्या समृद्धी’ व ‘आरडी’ खाते उघडा;16 मार्चपासून अमरावतीत विशेष मोहीम

नवीन 125रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागवल*1 ते 15 ऑगस्ट दरम्यान करता येणार अर्ज

शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा;संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश…

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

vishwatmaklokswamivarta

ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न