vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वच्छतागृहे सखोल स्वच्छता मोहीमा 

‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वच्छतागृहे सखोल स्वच्छता मोहीमा

 

नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर देताना त्यामध्ये सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छतेकडेही नियमित लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये अधिक भर घालत आज रविवार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या शौचालयांमध्ये ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शौचालयांची अंतर्गत स्वच्छता करण्यात आलीच शिवाय आसपासचा परिसरही सखोल स्वच्छ करण्यात आला. यासाठी स्प्रेईग जेटचा वापर करण्यात आला तसेच निर्जंतुकीकरणही करण्यात आले. शेवाळ झालेल्या ठिकाणी पावडर टाकून आसपासचा निसरडा परिसर स्वच्छ करण्यात आला.

 1 जुलैपासून सुरू झालेल्या ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये दररोज स्वच्छता आणि आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याभराचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आज आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची सखोल स्वच्छता करण्यात आली. काही ठिकाणी नागरिकही या मोहीमेत उत्साहाने सहभागी झाले.

अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या माध्यमातून, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री.नरेश अंधेर, नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त श्री.जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री.अरुण पाटील, वाशी विभागाचे सहा.आयुक्त श्री.सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी श्रीम.जयश्री आढळ, तुर्भे विभागाचे सहा.आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री.जयेश पाटील, कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त श्री.भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री.राजुसिंग चव्हाण, घणसोली विभागाचे सहा. आयुक्त श्री.उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन, ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे, दिघा विभागाचे सहा.आयुक्त श्री.नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी श्री.प्रविण थोरात यांनी आपल्या विभाग कार्यालयातील सहकारी तसेच स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि शौचालयातील स्वच्छताकर्मी व नागरिक यांच्या सहयोगातून या सखोल स्वच्छता मोहीमा यशस्वीपणे राबविल्या.

000000

संबंधित पोस्ट

लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकालात सारथी, पुणे संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड…

इनोव्हेशन’ लोकोपयोगी असावे – पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला बळ 

आज ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबरला विष्णुदास भावे नाटयगृहात होणार पारितोषिक वितरण.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर