vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आज ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबरला विष्णुदास भावे नाटयगृहात होणार पारितोषिक वितरण.

आज ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबरला विष्णुदास भावे नाटयगृहात होणार पारितोषिक वितरण..

      नवी मुंबई प्रतिनिधी      दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कलागुणदर्शन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षीही या स्पर्धा 26 सप्टेंबर पासून आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी मोठया उत्साहात सहभाग घेउुन या स्पर्धा यशस्वी केल्या.

            यामध्ये गायन स्पर्धेत 68, काव्यवाचन स्पर्धेत 23, कथाकथन स्पर्धेत 20, हास्य स्पर्धेत 11, वेशभुषा स्पर्धेत 12, नृत्य स्पर्धेत 08, टेलीफोन स्पर्धेत 13, समुह नाटिकेत 01, एकपात्री अभिनय स्पर्धेत 10, निबंध स्पर्धेत 16, पत्रलेखन स्पर्धेत 11 तसेच ब्रिझ गेम्स स्पर्धेत 22, कॅरम स्पर्धेमध्ये 134 आणि बुध्दीबळ स्पर्धेत 31 ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला.

            ज्येष्ठांप्रती आपुलकी जपणारी महानगरपालिका ही नवी मुंबई महानगरपालिकेची सर्वदूर ओळख असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठांकरिता विविध सेवासुविधा पुरविण्यात येत असतात. त्याचप्रमाणे ज्येष्ठांना त्यांचे अंगभूत गुण प्रदर्शित करता यावेत या दृष्टीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध कलागुणदर्शनपर स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते.

            या स्पर्धेचा पारितेषिक वितरण समारंभ दि. 01 ऑक्टोबर 2025 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या विष्णुदास भावे नाटयगृह वाशी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात संपन्न होणार असून दि. 01 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या विवाहास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा ज्येष्ठ नागरिक जोडप्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

  तरी जागतिक जेष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसह त्यांच्या कुटूंबियांनीही आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.

ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार हायस्पीड रेल्वेमार्फत हा प्रस्ताव राबविण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन 

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन*

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह घणसोली, सेक्टर-2 वसतिगृहाकरिता खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्याकरीता इच्छुक इमारत मालकांचे अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटीद्वारे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta