vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

रूग्णालयातील रांगांपासून ‘आभा’ ॲपमुळे सुटका –सर्वाधिक ऑनलाईन नोंदणी करणारे वाशी रूग्णालय ‘टॉप थ्री’ मध्ये*

*रूग्णालयातील रांगांपासून ‘आभा’ ॲपमुळे सुटका –सर्वाधिक ऑनलाईन नोंदणी करणारे वाशी रूग्णालय ‘टॉप थ्री’ मध्ये*

 

         आरोग्य प्रतिनिधी- आरोग्य सेवांमध्ये डिजीटलायझेशनचा वापर करून नागरिकांना विनासायास उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयुष्मान भारत डिजीटल मिशन (एबीडीएम) हा अभिनव उपक्रम केंद्र सरकारने सुरू केला असून हे ‘आभा’ ॲप नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरते आहे.

     यामधील प्राथमिक महत्वाची गोष्ट म्हणजे याव्दारे नागरिकांची रूग्णालयात केसपेपरच्या नोंदणीसाठी रांगेत उभे रहावे लागल्याने खर्च होणा-या वेळेची मोठी बचत होत असून आता क्यू आर कोड स्कॅन करून आभा ॲपव्दारे झटपट नोंदणी होत आहे. नागरिकांचा केसपेपरसाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचत असल्याने आभा उपक्रम हा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी वरदान असल्याचे अभिप्राय प्राप्त होत आहेत.

अखिल भारतीय डिजीटल मिशन मार्फत या उपक्रमाकरिता महाराष्ट्रातून 6 मॉडेल फॅसिलिटीची निवड करण्यात आलेली असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक रूग्णालय, वाशी हे संपूर्ण देशातील निवड झालेल्या 131 रूग्णालयांपैकी एक तसेच सर्व महानगरपालिका रूग्णालयांतून निवड झालेले एकमेव महापालिका रूग्णालय आहे.

     या उपक्रमाला पहिल्या दिवसापासूनच रूग्णालयात उपचारांसाठी येणा-या रूग्णांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून आत्तापर्यंत 5,36,737 इतके टोकन देण्यात आलेले आहेत. नागरिकांचा या उपक्रमाला इतका उत्तम प्रतिसाद लाभत आहे की, रूग्णालयामध्ये येणा-या साधारणत: 65 टक्के रूग्णांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचा टोकनसाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास पूर्णत: वाचला आहे.

      सर्वाधिक आभा टोकन देणारे नमुंमपा सार्वजनिक रूग्णालय, वाशी हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम 3 रूग्णालयांपैकी एक आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार वाशी रूग्णालयासोबतच नमुंमपा माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ तसेच राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोली या रूग्णालयांमध्येही ऑनलाईन केसपेपर दिले जात असून ही रूग्णालयेदेखील ऑनलाईन रूग्ण नोंदणीमध्ये अग्रेसर आहेत.

  ऑनलाईन केसपेपर काढता यावेत याकरिता वाशी, नेरूळ व ऐरोली येथील महापालिका रूग्णालयात स्कॅनर बारकोड प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. रूग्णांनी आपल्या मोबाईलमध्ये आभा ॲप डाऊनलोड करावयाचे आहे व तो बारकोड स्कॅन करावयाचा आहे. त्यानंतर रूग्णांना टोकन क्रमांक मिळतो. त्यामुळए रूग्णांना केसपेपर काढणे, बाह्यरूग्ण विभागात (ओपीडी) डॉक्टरांना भेटणे यासाठी रांग लावण्याची आवश्यकता भासत नाही. याठिकाणी स्क्रीन बसविलेल्या असून यावर टोकन नंबर आणि कोणत्या डॉक्टरांना कोणत्या रूम नंबर मध्ये भेटावयाचे याची माहिती प्रदर्शित होते. त्यानुसार डॉक्टरी सल्ला व उपचार घेणे अत्यंत सुलभ आणि सोयीचे झाले आहे.

    आभा उपक्रमातील विशेष बाब म्हणजे एबीडीएमच्या माध्यमातून प्रत्येक रूग्णाचे वैद्यकीय रेकॉर्ड त्याने नोंदणी केलेल्या ॲपमध्ये डिजीटल स्वरूपात संग्रहित केले जात असून त्याचा हा वैद्यकीय इतिहास त्याच्यावर पुढे कुठेही करावयाच्या उपचारांसाठी वापरता येणार असल्याने महत्वाचा आहे.याव्दारे डॉक्टरांना रूग्णाची संपूर्ण वैद्यकीय माहिती व इतिहास त्वरित उपलब्ध होत असल्याने त्याच्या आजाराचे निदान करणे आणि त्याच्यावर योग्य उपचार जलद करण्यास मदत होते.

   त्यामुळे उपचारासाठी नवी मुंबई महानगरपालिका रूग्णालयात येणा-या प्रत्येक नागरिकाने आभा ॲप डाऊनलोड करून रांगेत उभे न राहता ऑनलाईन टोकन नंबर त्वरित प्राप्त करून घ्यावा आणि त्यासोबत आभा ॲपवर असलेली आपले वैद्यकीय रेकॉर्ड एकत्रित ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून घ्यावी असे सूचित करतानाच महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांना सर्वच नागरिकांनी आभा ॲपचा वापर ते डाऊनलोड करून सुरू करावा असे आवाहन केले आहेआहे.

0000

 

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात ‘अतिसार थांबवा’ मोहीम १६ जून ते ३१ जुलै दरम्यान राबविण्यात येणार

नमुंमपा ईटीसी केंद्राच्या मदतीने सात महिन्यांच्या बाळाची कॉक्लियर इम्प्लान्ट (Cochler Implant) सर्जरी यशस्वी

vishwatmaklokswamivarta

17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान

vishwatmaklokswamivarta

गर्भधारणापूर्व व प्रसुतिपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदयाच्या कार्यशाळेस डॉक्टरांचा उत्तम प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त….रक्त देऊ या..आशा जागवू या- एकत्रितपणे जीव वाचवू या…।

एम्स नागपूर आणि बाल आयुष फाउंडेशन यांच्यात अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बीएमटी) सेवावृद्धीसाठी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta