vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त.

 

प्रतिनिधी मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरू असतानाच आज कारवाईचे पुढचे पाऊल टाकण्यात आले असून देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली ४.२० कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

 

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्या आरोपाच्या आधारे मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार अनिल देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांची ईडी व सीबीआय मार्फत सध्या चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सीबीआयने मूळ गुन्हा दाखल केलेला असून त्याच अनुषंगाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख व कुटुंबीयांची ४.२० कोटी रुपयांची मालमत्ता आज जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख आणि प्रीमियर पोर्ट लिंक्स कंपनीच्या नावावर आहे. त्यात वरळी येथील १.५४ कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट आणि उरण (रायगड) येथील धुतूम गावातील २.६७ कोटी किंमतीच्या जमिनीचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

भाजप साठी जालना विधानसभेची जागा मिळणेसाठी प्रयत्न करणार जालना विधानसभा भाजपा बहुमताने जिंकणार-माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  10 जून किंवा त्याआधीच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार भाजप नेते नितेश राणे यांचा दावा

राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष, शरद पवारांची मोदी सरकारवर जोरदार टीका, म्हणाले देशाला एकसंध ठेवण्याचे आज देशासमोरील सर्वात मोठे आव्हान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे युतीसाठी करतील प्रचार

vishwatmaklokswamivarta

विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदममाझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा

vishwatmaklokswamivarta

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांची जाहीर घोषणा  उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ”हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!”