vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम

महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम

 सातारा प्रतिनिधी: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे पॉश अॅक्ट, पिडीत नुकसान भरपाई योजना तसेच समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनियता या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना नि. बेदरकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अड. मनिषा बर्गे, अड, सुचिता पाटील, सहाय्यक लोकअभिरक्षक कार्यालय सातारा तसेच सर्व प्रशिक्षक व आयोजक उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना नि. बेदरकर यांनी पिडीत नुकसान भरपाई योजना, नालसा योजना या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर अड. मनिषा बर्गे यांनी पॉश अक्ट २०१३ (महिलांचा लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा, २०१३) या विषयी माहिती दिली. तर अड. सुचिता पाटील यांनी समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनियता या विषयी माहिती दिली.

0000

संबंधित पोस्ट

नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे विभागाची जबाबदारी – पालकमंत्री संजय राठोड उपजिल्हा रुग्णालय दारव्हा येथे आढावा

पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिल्यामुळे भारताच्या दळणवळण खर्चात मोठी कपात झाली आहे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठा निधी, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांना मिळाली गती

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर

हरवलेल्या व्यक्तीचा शोध किशोर बेपत्ता : जयेश चौरसिया ८ फेब्रुवारीपासून बेपत्ता.

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवेचा शुभारंभ, एकाच क्लिकवर मिळणार अर्जाची स्थिती व कर्ज मार्गदर्शन

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा