vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर

 

बुलडाणा, प्रतिनिधी- पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये ढासाळवाडी, सैलानी, पिंपळगाव सराई, चौथा व पिंपरखेड या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली.

  ढासाळवाडी गावाला 2050 पशुधन व 254 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 86 हजार 880 लिटर्स पाणी पुरवठा करणार आहेत. सैलानी गावाला 150 पशुधन व 1008 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 24 हजार 660 लिटर्स पाणी, पिंपळगाव सराई गावाला 592 पशुधन व 5592 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 1 लक्ष 19 हजार 600 लिटर्स पाणी, चौथा गावाला 430 पशुधन व 1678 लोकसंख्येसाठी एक टँकर 72 हजार 100 लिटर्स व पिंपरखेड गावाला 450 पशुधन व 800 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 21 हजार 500 लिटर्स पाणी दररोज टँकरव्दारे पुरवठा करेल.

पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार 9 महिला सरपंचांचा समावेश

विकसित कृषी संकल्प अभियानाचे-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..             

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकाराने 23 व 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे ‘पर्यटनाचा महाकुंभ 2025’ चे आयोजन…

समडोळी येथे शास्त्रज्ञ व शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न

यूपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत

vishwatmaklokswamivarta