vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी २२ जुलै रोजी खामगाव येथे रोजगार मेळावा आणि मार्गदर्शन सत्राचे आयोज न चिखली येथे प्लेसमेंट ड्राईव्ह

जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी २२ जुलै रोजी खामगाव येथे रोजगार मेळावा आणि मार्गदर्शन सत्राचे आयोज न चिखली येथे प्लेसमेंट ड्राईव्ह

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील युवक-युवतींना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाव्यात आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत खामगाव आणि चिखली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.हा रोजगार मेळावा दि. २२ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता खामगाव येथील श्री सिध्दीविनायक टेक्निकल कॅम्पस, जिल्हा शेगाव रोड येथे पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.तसेच याच दिवशी सकाळी १०.३० वाजता जि. एस. विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याबाबत विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.

चिखली येथे प्लेसमेंट ड्राइव्ह-याशिवाय, दुपारी १.०० वाजता श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची नोंदणी प्रक्रिया, स्वयंरोजगार संधी आणि प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी देखील नामांकित कंपन्यांकडून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.या रोजगार मेळाव्यासाठी पात्र उमेदवारांनी आपले बायोडेटा, फोटो व शैक्षणिक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. “जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार व प्रशिक्षणाच्या संधी मिळाव्यात हा आमचा मुख्य उद्देश आहे. इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.” – गणेश प्र. बिटोडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा

000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंतजिल्ह्याचे योगदान सव्वा तीन कोटी रुपयांचे

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळातील सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक –

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण,स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक- मुख्यमंत्री फडणवीस

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकार संपूर्ण अरवली पर्वतरांगेचे रक्षण करेल; खाण भाडेपट्टीने दिली जाणार नाहीत; संरक्षित क्षेत्राचा विस्तार केला जाणार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण