vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यात प्रगत टपाल तंत्रज्ञान (IT 2.0) प्रणाली ४ ऑगस्टपासूनकार्यान्वित होणार; देखभाल, दुरुस्तीसाठी २ ऑगस्ट रोजी सेवा स्थगित

जिल्ह्यात प्रगत टपाल तंत्रज्ञान (IT 2.0) प्रणाली ४ ऑगस्टपासूनकार्यान्वित होणार; देखभाल, दुरुस्तीसाठी २ ऑगस्ट रोजी सेवा स्थगित

छत्रपती संभाजीनगर,- प्रतिनिधी भारतीय टपाल विभागाने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्रगत टपाल तंत्रज्ञान प्रणाली (IT 2.0) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये सोमवार दि.४ ऑगस्टपासून कार्यान्वित होणार आहे. तसेच या प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी, शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी नियोजित देखभाल कार्य केले जाणार असल्याने छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील कोणत्याही डाक कार्यालयात टपाल व्यवहार सेवा उपलब्ध होणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे. ग्राहकांनी दि.२ ऑगस्ट रोजी असलेल्या सेवा बंद बाबत सहकार्य करावे व आपल्या टपाल व्यवहारांचे नियोजन करावे. प्रगत टपाल तंत्रज्ञान प्रणाली (IT 2.0) संदर्भात माहिती देण्यात आली की, या प्रणालीचा उद्देश ग्राहकांना अधिक जलद, सुलभ व कार्यक्षम सेवा पुरविणे असून, ही प्रणाली भविष्यातील गरजांनुसार डिजिटली सक्षम व स्मार्ट सेवा देईल. ग्राहकाभिमुख दृष्टिकोनातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या माध्यमातून टपाल सेवा अधिक पारदर्शक, वेगवान व आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत होणार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

०००००

संबंधित पोस्ट

केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थींना द्यावा- खासदार विशाल पाटील- दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

सांगलीच्या सौंदर्यात भर पडेल अशी दर्जेदार कामे करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटीलमहानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष स्थापन

लखपती दिदी’ अभियानाला गती; महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

येत्या रविवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन