vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी काढला चिखलातून मार्ग आणि साधला शेतकर्‍यांशी संवाद; अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी..

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी काढला चिखलातून मार्ग आणि साधला शेतकर्‍यांशी संवाद; अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी..

राज्य प्रतिनिधी-जालना जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी बुधवार दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळ पासून बदनापूर व अंबड आणि जालना तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकर्‍यांच्या बांधावर जाण्यासाठी खा. डॉ. कल्याण काळे यांना चिखल तुडवित मार्ग काढावा लागला. अखेर शेतकर्‍यांच्या नुकसानग्रस्त शेतीमध्ये जावून काळे यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला.

बदनापूर तालुक्यातील तळणी, वाकूळणी तसेच अंबड तालुक्यातील मठ जळगाव, बनटाकळी आणि जालना तालुक्यातील गोलापांगरी यासह विविध गावातील शेतात आणि परिसरात जावून त्यांनी प्रत्यक्ष शेतकर्‍यांची व्यथा जाणून घेतली. पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहता तात्काळ पंचनामा करून शेतकर्‍यांना त्वरित मदत मिळावी, अशा सूचना महसूल विभागाला डॉ. काळे यांनी दिल्या.

या पाहणीवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्न राख,बदनापूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण म्हसलेकर, जयप्रकाश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राम सिरसाठ, भानुदास घुगे, कल्याण तारडे, दिनेश काकडे, बप्पासाहेब डोखळे, हनुमान धांडे, रामेश्वर फंड, जयसिंग राजपुत, सुभाष काटकर, विनायक आबा कोळकर, सुदाम काळे, तुकाराम संत, बंडु पागिरे,कृष्णा पाटील पडुळ, सोपान तिरूखे, माऊली इंगोले तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता लक्षात घेता शेतकर्‍यांना त्वरित आर्थिक मदत व दिलासा मिळणे आवश्यक असल्याचे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले

संबंधित पोस्ट

प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सरदार 150 एकता अभियान· विविध उपक्रमाचे आयोजन· ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये : पर्यटकांशी साधला संवाद • पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलल हास्य..

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta

गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज!

vishwatmaklokswamivarta

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस