vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात 4 दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट, मुंबई उपनगरांसाठी 24 तास महत्वाचे

 राज्यात 4 दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट, मुंबई उपनगरांसाठी 24 तास महत्वाचे…

प्रतिनिधी,राज्यात कोकणमध्ये (Konkan) पुन्हा धो धो पाऊस (Rain) कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील 24 तासात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department (IMD) वर्तविला आहे. तर मुंबई (Mumbai Rain) , ठाणे, पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट असणार आहे. 23 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, उपनगरांसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत.

कोकण विभागातील मुंबई आणि इतर जिल्ह्यांत भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) ‘रेड अलर्ट’ बजावला असून येत्या 24 तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रविवार रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पुढील 48 तास मुंबईसह उपनगरात आणि शेजारील जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरल्याचे पाहायला मिळाले. पावसाची कोसळधार कायम राहिल्यानं अनेक सखल भागांत पाणी साचले होते. लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला. आता कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे.

संबंधित पोस्ट

अभिनेता अमिर खानवर पुन्हा एकदा बायकॉटचं संकट, नव्या जाहिरातीवरुन वाद शिगेला पेटणार?

vishwatmaklokswamivarta

संपूर्ण महाराष्ट्रातील दुसरे प्रभू श्री धनकुबेर यांचे मंदिर ; धन दैवतांची पूजा करण्याचे आवाहन

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण,• महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय• महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार..

भारतातील विविध राज्यांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज.

vishwatmaklokswamivarta

एकनाथ शिंदेच राहणार राज्याचे मुख्यमंत्री’, अफवांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण..