vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हर घर तिरंगा’ अभियान तीन टप्प्यात – नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियान तीन टप्प्यात – नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी: स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापन दिन साजरा करताना राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान तीन टप्प्यांमध्ये साजरे करण्यात येत असून, या अभियानात प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

पहिला टप्पा : जनजागृती व नोंदणी (२ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२५)पहिल्या टप्प्यात स्वयंसेवकांची नोंदणी, शाळा स्तरावर जनजागृती उपक्रम, लोकसहभाग वाढविणे आणि सर्वत्र तिरंगामय वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शाळांमधून देशभक्तीपर कार्यक्रम, तिरंग्याचे महत्त्व सांगणाऱ्या कार्यशाळा, प्रभातफेरी, पोस्टर प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येत आहे.

दुसरा टप्पा : तिरंगा उत्सवाचे सृजन (९ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट)या टप्प्यात नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह निर्माण होईल, असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये नागरिकांना एकत्रित आणणे, तिरंग्याच्या विक्रीसाठी केंद्र स्थापन करणे, तिरंगा सेल्फी अपलोड मोहिम, सोशल मीडियावर जनसंपर्क वाढविणे, स्पॉटलाइट आणि प्रचार साहित्य तयार करणे यांचा समावेश आहे.

तिसरा टप्पा : तिरंगा फडकविण्याची कृती (१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट)या अंतिम टप्प्यात प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावणे, शासनाच्या सर्व कार्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदविणे आणि अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. सार्वजनिक इमारती, शाळा, व्यापारी संकुले तसेच खासगी घरांवरही ध्वज फडकविण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी पंडा यांनी हर घर तिरंगा अभियान हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होत देशभक्तीची भावना सादर करण्याचे व सर्वांनी मिळून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने या अभियानासाठी विविध समित्या, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना सहभागी करून घेण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांचा सकारात्मक प्रतिसाद स्थलांतरणाला पूर्ण सहकार्य करण्याचे सरपंचांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन

स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्कØ वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

धारणीतील महाविधी शिबिरात शेवटचा घटक आश्वस्त*विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम*36 स्टॉलवर शासकीय विभागांची माहिती….

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

vishwatmaklokswamivarta