vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कानडवाडी येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..

कानडवाडी येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..

 सांगली, प्रतिनिधी : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 या कार्यक्रमास आमदार डॉ. सुरेश खाडे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कं. लि. च्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर, एमएसईबी कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, सांगली मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, सांगली ग्रामीणचे कार्यकारी अभियंता सुरेश सवाईराम, सांगली शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता, महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे, शेखर इनामदार आदि उपस्थित होते.

 या ठिकाणी यापूर्वी उपलब्ध क्षमतेपेक्षा अधिक भार आल्यामुळे वारंवार कमी दाबाचा पुरवठा, नवीन ग्राहकांना जोडणी देताना अडचण, कृषी वसाहतींना अपुरा पुरवठा, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रात नियमित तक्रारी व उत्पादनात अडथळे या समस्या उद्भवत होत्या. यामध्ये संचालिका नीता केळकर यांनी वैयक्तिक लक्ष घालून त्वरित मुख्य कार्यालय मुंबई येथून मंजुरी घेऊन 200.04 लक्ष इतका निधी त्वरित उपलब्ध करून दिला. यामुळे कानडवाडी उपकेंद्रामधील एका पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता 5 एम.व्ही.ए. वरून 10 एम.व्ही.ए. करण्यात आली.

  या कामामुळे कानडवाडी, सावळी व तानंग गावांसाठी नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक भार, वाढीव वीजभार देणे शक्य, पूर्वी कमी दाबाने मिळणारा पुरवठा आता योग्य दाबाने व सुरळीत उपलब्ध हे लाभ झाले. उपकेंद्रातून 11 के.व्ही.च्या दोन उच्चदाब वाहिन्या नव्याने कार्यान्वित होऊन अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा, उद्योग, व्यवसाय व ग्रामविकासाला नवे बळ मिळाले.

 या योजनेसाठी एकूण 200.04 लाख रूपये एन.एस.सी. योजनेतून खर्च झाले. या योजनेचे लाभार्थी ग्राहक 2679 घरगुती ग्राहक, 341 औद्योगिक ग्राहक, 271 व्यावसायिक ग्राहक व 709 कृषी ग्राहक आहेत. यामुळे भविष्यात औद्योगिक गुंतवणुकीत वाढ, रोजगारनिर्मितीला चालना व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.

 या कामामुळे वीज ग्राहकांनी व औद्योगिक संघटनांनी त्यांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींचे निवारण झाल्यामुळे समाधान व्यक्त केले. आभार अधीक्षक अभियंता बोकील यांनी मानले. या कार्यक्रमास कानडवाडी व सावळी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ तसेच सावळी, कानडवाडी व तानंग हद्दीमधील औद्योगिक ग्राहक संघटना उपस्थित होत्या.

00000

संबंधित पोस्ट

महानगर प्रदेशात महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी अभिनव प्रकल्पाचा प्रस्ताव-छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार – केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात; मुंबईकरांचे सहकार्य आणि प्रशासकीय यंत्रणेचे काम कौतुकास्पद : मंत्री मंगलप्रभात लोढा

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी डिजिटल माध्‍यमातून अधिक बळकट करण्यासाठी ‘पीएम-अजय’ पोर्टल आणि ‘अजय’ मोबाईल ॲपचा केला प्रारंभ

महाराष्ट्र शासनाचे नऊ, ११, १६ व २५ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस चे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर त्यांच्या राहत्या घरी निधन

vishwatmaklokswamivarta