महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरली आहेत, राज्यातील २९९७ धरणांत एकूण ११६२.३६ टीएमसी पाणीसाठा नोंदवला.
राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरली आहेत, राज्यातील २९९७ धरणांत एकूण ११६२.३६ टीएमसी पाणीसाठा नोंदवला गेला आहे, जो अंदाजे 81 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे बारा टक्के अधिक पाणी धरणांत साठल्याचे सांगितले जाते. राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून, घाटमाथ्यावर अजूनही पावसाचा जोर कायम आहे, ज्यामुळे धरणांत पाण्याची सतत आवक सुरु आहे.
कोकणात मागील चार-पाच दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. भात खाचरे भरून वाहू लागली आहेत आणि ओढे-नाले आपटून वाहत आहेत. या भागातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, आणि जगबुडी नद्यांनी इशाराजली पार केली आहे. मुंबई महानगर पालिकेअंतर्गत असलेल्या अनेक धरणेही नव्वद टक्के किंवा त्यापुढे भरली आहेत
धरणांतून विसर्ग सोडण्यात आला असून, भातसा धरणातून ७०२ क्युसेक, सूर्या कवडा धरणातून ७१७९ क्युसेक, वैतरणा अप्पर धरणातून ७११९, जगबुडी कोकण धरणातून ४१९, गडनदी कोकण धरणातून ३२५५, आणि सातंडी नाला कोकण धरणातून ४७२१ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.
धरणात पाणी सोडण्याच्या आधी जलसंपदा विभागाने निर्धारित केलेले नियम आणि पातळीचे निरीक्षण केले जाते. धरणात पाणलोटक्षेत्रातील पावसाचा विचार करून पाणी किती प्रमाणात कधी सोडायचे हे निश्चित केले जाते. धरणांवर गेज पट्ट्या असल्याने पाण्याचे स्तर वेळोवेळी मोजले जातात. पाणी सोडताना आसपासच्या भागाला संशय असूळण्यासाठी चार ते पाच तास आधी महसूल विभाग, पोलिस प्रशासन व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. प्रशासनाकडून नदीकाठीची ग्रामस्थे आणि नागरिकांना योग्य सूचना व मदत पुरवली जाते.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून सर्वाधिक १४,५५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे. उजनी धरणातून भीमा नदीत एक लाख चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे. या भागातील काही गावांमधील सुमारे शंभर कुटुंबांचे स्थलांतर सुरू आहे. पंढरपूर व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन सतर्क आहे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या परिस्थितीत नागरिकांनी जागरूक राहावे, प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. राज्यातील पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवून प्रादेशिक प्रशासन पुढील उपाययोजना करत आहे.