vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गडचिरोली पोलीस दल – प्रोजेक्ट उडान चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ संपन्न..

गडचिरोली पोलीस दल – प्रोजेक्ट उडान चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ संपन्न..

राज्य प्रतिनिधी

गडचिरोली पोलीस दलाच्या स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ दि. 28/03/2026 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे पार पडला.

माओवादग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “दादालोरा खिडकी” अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट उडानमधून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

दि. 24/02/2026 ते 27/03/2026 या कालावधीत आयोजित प्रशिक्षणात गडचिरोली, कुरखेडा, पेंढरी व इतर उपविभागातील 120 पुरुष व 60 महिला असे एकूण 180 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. सर्वांना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन लर्निंग परवाना उपलब्ध करून देण्यात आला असून कायमस्वरूपी परवान्याची प्रक्रियाही सुरू आहे

आतापर्यंत स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एकूण 1310 युवक-युवतींना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी परवाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.निरोप समारंभात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

0000

संबंधित पोस्ट

श्रद्धेच्या नावाखाली विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न ! वारी भक्तीची, नास्तिकतावादाची नाही !

गोकुळ’चे ‘हलाल प्रमाणपत्र’ तत्काळ रद्द करा; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक*

vishwatmaklokswamivarta

पैठण रस्त्यावरील रहदारीसाठी पर्यायी वाहतुक मार्ग

दरड कोसळल्याने किल्ले रायगडाचा पायरी मार्ग दोन दिवसांसाठी बंद

भारत माता की जय’च्या गजरात दुमदुमली कामठी नगरी – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर कामठीत तिरंगा यात्रा

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन