vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई

परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई

मुंबई, प्रतिनिधी-

ठाणे जिल्ह्यातील खारेगांव – ठाणे रस्त्यावर गोवा राज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर खारेगांव येथे ३ सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा राज्यात निर्मित भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या १४०० बॉक्स दारूबंदी कायद्यातंर्गत जप्त करण्यात आले. टाटा कंपनीच्या डीडी ०१ ए ९०१७ क्रमांक असलेल्या चारचाकी टेम्पो वाहनासह एकूण १ कोटी ५६ लाख ६३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी मोहम्मद समशाद सलमानी (वाहनचालक) यास अटक करण्यात आली आहे.

    राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे, उपअधीक्षक श्री. पोकळे, श्री. वैद्य, नवी मुंबईचे उपअधीक्षक ए. डी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक एम. पी धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, सहा. दुय्यम निरीक्षक बी. जी थोरात, तसेच जवान पी. एस नागरे, पी. ए महाजन, व्ही. के पाटील, श्रीमती एस.एस यादव, एम. जी शेख यांचा सहभाग होता.

 या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक प्रवीण तांबे, निरीक्षक श्री. धनशेट्टी करीत आहेत, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

स्व.अजीत दादा यांच्या जयंतीनिमित्त अरविंद चव्हाण यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप**सोनाई रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम*

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने लेखक दिनकर काकडे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या  शाळांवर बाल हक्क आयोगाची थेट कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना अर्धन्यायिक सुनावणीचे समन्स,विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, वृत्तांची ‘सुओ-मोटो’ दखल७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी, अहवाल न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

दादर येथे आंदोलन काश्मीरमधील पर्यटकांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करत कठोर सैन्य कारवाईची मागणी !पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु जनजागृती समिती

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट,कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती..