
न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू होणारमुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय अहवालानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
पालघर,पुणे, सोलापूर,सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, बीड असे सुमारे
एकूण ११ जिल्हयांमध्ये एकंदर स्थिती अनुकूल नसल्याने न्यायालयीन
कामकाज पूर्ववत सुरु करण्याजोगी परिस्थिती नसल्याचा अहवाल आल्याने, तोमान्य करुन, तेथील कामकाज सुरु करण्यासंबंधी निर्णय आज रोजी स्थगितठेवण्यात आला आहे.उर्वरित सर्व जिल्हयामध्ये आता सर्व प्रकरणाची नियमित सुनावणी पुढीलकाळात दोन सत्रामध्ये सर्व न्यायाधिश व वकील पूर्ण वेळ काम करतील. गर्दीन करता, करोनाचे शासकीय नियम पाळून काम करण्याची अपेक्षा मा. मुख्यन्यायमूर्ती यांनी व्यक्त केली आहे. तसेच सर्व वकील, न्यायाधिश, कर्मचा-यांनी
स्वत: लसीचे दोन्ही डोस घ्यावेत असे आव्हान करण्यात आले आहे.
सुमारे दीड वर्षापासून बंद असलेल्या न्यायालयीन कामकाजाला आता गती
मिळणार असून वकील वर्ग आणि न्यायाधिश कर्मचारी यांनी एकमेकांच्या साथीने
न्यायालयीन कामकाज करावे अशी विनंती वकील परिषदेचे अध्यक्ष अड. श्री.
अनिल गोवारदिपे व इतर सदस्यांनी महाराष्ट्र व गोवा राज्यातील वकील वर्गाला
केलेली आहे. या बैठकीला अड. जयंत जायभावे, अड. सुदिप पासबोला
अड. सतिश देशमुख, अड. हर्षद निबांळकर ॲड. गजानन चव्हाण, अड. व्ह
बी. कोंडेदेशमुख, अड. मिलिंद थोबडे, अड. अविनाश भिडे, अड. वसंत
भोसले, अँड. अमोल सावंत, अड. आशिष देशमुख, अड. राजेंद्र उमाप,
मिलिंद पाटील, अड. संग्राम देसाई, अड. सुभाष घाटगे, अड. उदय वारुंज
हे उपस्थित होते.
अड. अनिल गोवरदिपे
अध्यक्ष
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि



