vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते व्हॉट्सअप चॅटबॉट नागरी सुविधेचे लोकार्पण

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते व्हॉट्सअप चॅटबॉट नागरी सुविधेचे लोकार्पण

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्तेराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र रायगड निर्मित “व्हॉट्सअप चॅटबॉट नागरी सुविधा” या नवीन डिजिटल सेवचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी निलेश लांडगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.या चॅटबॉटद्वारे नागरिकांना जिल्हाधिकारी तसेच सर्व शासकीय कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध शासकीय सेवा, योजना, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, आवश्यक मार्गदर्शन याबाबत अधिकृत, जलद आणि तपशीलवार माहिती मिळणार आहे. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार धाव घेण्याची गरज भासणार नाही, तर मोबाईलवरच आवश्यक माहिती सहज उपलब्ध होणार आहे.या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होणार असून, डिजिटल युगातील “स्मार्ट गव्हर्नन्स” कडे रायगड जिल्हा एक पाऊल पुढे टाकत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या वेळी केले

ॲपचा वापर कसा करावा:नागरिकांनी 7499478633 या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा दिलेला QR कोड स्कॅन करून, उघडलेल्या व्हॉट्सअॅप विंडोमध्ये “Hi” असा संदेश पाठवायचा आहे. त्यानंतर संबंधित सेवांबाबत मेनू स्वरूपात माहिती उपलब्ध होईल.

०००

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2025 चे आयोजन उद्योजक,नवउद्योजक, गुंतवणूकदारांनी उपस्थित राहावे

एप्रिलला साप्ताहिक कल्याण प्रजाराजच्या ३०व्या वर्धापन समारंभाचे आयोजन…

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवाई दलाच्या चिनूक विमानांनी हिमाचल प्रदेशातील चंबा इथल्या मणिमहेश तीर्थक्षेत्रातून अडकलेल्या यात्रेकरूंना यशस्वीरित्या बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढइयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दिलासा

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक बांधकाम विभाग-भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्गभूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

vishwatmaklokswamivarta