vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस पारितोषके

दि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस पारितोषके

जालना, (प्रतिनिधी)-दि जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सलग ८ व्या वर्षी सन २०२५ करीता देशातील लहान जिल्हा सहकारी बँकाच्या वर्गवारीमधुन उत्तम संगणकीय सेवा,सुविधा कामकाजासाठी देश पातळीवरील नामांकित संस्था प्रâंटियर को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन(एफसीबीए२०२५)यांच्याकडुन १८ सप्टेंबर रोजी ०२ पारितोषके गोवा-पणजी येथीलभव्य समारंभात प्रदान ११ करण्यात आले.

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जालना बँकेला’ लिडरशिप अवॉर्ड -आय.टी. हेड ऑफ द ईयर ‘ व ‘ बेस्ट पेमेंट ट्रान्सफॉर्मेशन ‘ या बँकिंगसंगणकीय सेवा उपलब्धता व ग्राहकांना डिजीटल पेमेंटच्या सुविधा उपलब्धकरुन दिलेल्या कामकाजासाठी ‘फंट्रीयर को-ऑपरेटिव्ह बँक्स अवॉर्ड’ यादशातील नामांकित संस्था यांनी देशभरातील ५०० पेक्षा अधिक नागरी व जिल्हाबँकांच्या नामाकंन यादी मधुन रु. १,००० कोटी पेक्षा कमी ठेवी असलेल्याजिल्हा सहकारी बँकांच्या वर्गवारीमधुन जालना जिल्हा बँकेच्या उल्लेखनियकामगिरीबद्दल जालना जिल्हा बँकेची सलग ०८ व्या वर्षी सन २०२५ करीताउपरोक्त ०२ पारितोषकासाठी तज्ञ ज्युरी यांचे सकारात्मक शिफारसीनुसार निवडकरुन बँकेस पारितोषके जाहीर करण्यात आले.बँकेस ‘पणजी-गोवा ‘ येथे गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकरयांच्या प्रमुख उपस्थितीसह आयोजित भव्य सोहळयामध्ये बँकेस हा सन्मान ‘नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोशन ऑफ इंडीया,नवी दिल्ली यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रभात चर्तुवेदी तसेच दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सेवा निवृत्त कार्यकारी संचालक तथावरीष्ठ तज्ञ ज्युरी सदस्य प्रमोद कर्नाड यांच्या हस्ते पारितोषक चषकबँकेचे कार्यकारी संचालक आशुतोष देशमुख व व्यवस्थापक दादाराव राऊत तसेचबँकेचे वरीष्ठ अधिकारी, संगणक प्रमुख व शाखा कर्मचारी प्रतिनिधी यांच्याउपस्थितीत प्रदान करण्यात आला. पारितोषक सोहळ्यास उपस्थितांचे जालनाजिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश टोपे व उपाध्यक्ष भिमराव जावळे यांनीव्यक्तीशः व बँकेचे सर्व संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन केले असुन यांस शुभेच्छा दिल्या आहेत

0000

संबंधित पोस्ट

संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद..

vishwatmaklokswamivarta

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून  -निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..🌳 जिल्ह्यातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

कांदळवनाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी बक्षीस योजना राबविणार – वनमंत्री गणेश नाईक

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विषयक प्रशिक्षण उपक्रमांतून देहविक्रय करणा-या महिलांसाठी विकासाच्या नव्या संधी..