vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी : सामान्य प्रशासन विभागात माहिती तंत्रज्ञान हा महत्वाचा विभाग आहे. राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा या विभागामार्फत नागरिकांना पुरविल्या जातात. त्यामुळे आता माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करून डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा शासनाचा निर्धार आहे. शासनाच्या सर्व सेवांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे, कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा आणि सायबर सुरक्षा यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

000

संबंधित पोस्ट

स्टँड-अप कॉमेडियन- कुणाल कामरा ने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवताच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील एका हॉटेलची तोडफोड …

थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविणार- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

१० लाख रुपयांची मदत बँक खात्यात जमा; मॅनहोल दुर्घटनेतील दिवंगत असलम शेख यांच्या पत्नीकडून पत्र लिहून महानगरपालिकेचे आभार-श्रीमती अंजुम शेख यांनी महापौरांप्रति व्यक्त केली कृतज्ञता

vishwatmaklokswamivarta

दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाचे गुरुवारी उद्घाटन*मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५+ देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta