मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधीत शेतकर्यांना मदतीची मागणी करणार्या हंबर्डा मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा !: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
जालना, (प्रतिनिधी)-मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधीत शेतकर्यांनामदतीची मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त यांच्याकार्यालयावर हंबरडा मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात हजारोंच्यासंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे.
मागील अनेक दिवसात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात प्रचंड मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अत्यंत हातबलझाला आहे. अशा प्रचंड बिकट परिस्थितीत शासनाच्या वतीने केवळ पाहणी दौदौरvआयोजित करण्यात येत असून आजपर्यंत शेतकर्याला प्रत्यक्ष कवडीचीही मदत झालेली नाही. या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून प्रती हेक्टरी५० हजार रुपये मदत मिळावी, शेतकर्यांना सरसकट कर्जमुक्त करावे.आपत्तीग्रस्त भागातील पशुधन व पडलेली घरे यांनाही मदत करावी या मागण्याकरिता मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून छत्रपती संभाजीनगर येथीलविभागीय आयुक्त यांच्या कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करणार आहेत.करीता या मोर्चात हजारोच्या संख्येने जालना जिल्ह्यातील शेतकर्यांनीसहभागी व्हावे. असे आवाहन राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी रविवार जालना येथील शिवसेना भवन येथे आयोजितपदाधिकार्यांच्या बैठकीत केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हाप्रमुख महेश नळगे, भानुदास घुगे,रमेश गव्हाड, भगवानराव कदम, मुरलीधर शेजुळ, मनीष श्रीवास्तव, हनुमानधांडे, देवनाथ जाधव, मुरलीधर थेटे, शहर प्रमुख बाला परदेशी, दुर्गेशकाठोठीवाले, दीपक रननवरे, महिला आघाडीच्या संघटक मंगल मेटकर, गंगूताई वानखेडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती .पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, राज्यातील शेतकरी अत्यंत अडचणीतअसतानाही राज्य शासन त्याला कोणतीही मदत करण्याची ठोस भूमिका घेतांना दिसत नाही. केवळ कोरडी आश्वासने देऊन व शब्दांचे फवारे उडवून चालणार नाही. त्यामुळे अशा या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी व शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने
आयोजित केलेल्या हंबरडा मोर्चास जिल्ह्यातील शेतकर्यांनी हजारोंच्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष सत्तेत नसतानाही केवळ पाहणी करणे, फोटो काढणे असे कार्यक्रम न करता पक्षाने नागरिकांना अल्प स्वरूपात का होईना परंतु थेट मदत देण्याचा प्रयत्न केला.अनेक नागरीवस्त्या झोपडपट्ट्यांत पाणी घुसले तेव्हा तेथील नागरिकांना पुरी भाजी, खिचडी, अन्नधान्याच्या किट अशी मदत करून नागरिकांना धीर देण्याचे काम केले. आपत्ती कोणतीही असो त्यात सर्वात अगोदर मदत शिवसेनेच्या वतीनेच करण्यात येते. अशा विपत्तीत नागरिकांना मदत करणे आपले कर्तव्य असते. गोदाकाठच्या गावातही पूरपरिस्थितीत अत्यंत धडाडीने नागरिकांना मदत करण्यात सर्वात पुढे शिवसैनिकच होते.परतुर तालुक्यातील आष्टी, गोळेगाव व लोणी परसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात गावात घुसलेल्या पाण्याने हाहाकार माजवला होता. तिथेही शिवसैनिकांनी
मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मदत व सहाय्य केले. सर्व शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळावी यासाठी येत्या येत्या ११ ऑक्टोबर रोज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या हंबरडा मोर्चात सर्व तालुक्यातील पदाधिकार्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहनजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले. तसेच येत्या ०८ तारखेलाहीजिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालया समोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने शेतकर्यांना तात्काळ मदत मिळावी याकरिता निदर्शने करण्यात येणार आहेत. जालना तालुक्याच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून निदर्शने करण्यात येणार असल्याचेही शिवसेना जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी सांगुण दोन्ही आंदोलनात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, जयप्रकाश चव्हाण, कैलास पुंगळे,कुंडलिक मूठ्ठे, पंडित गावडे, दिनेश काकडे, कुमार रुपवते, संदीप कंटुले,गणेश काळे,आबा कदम,भारत पंडित, मधुकर खरात यांच्यासह उपतालुकाप्रमुख प्रभाकर उगले, प्रभाकर घडलिंग, जि.प. प. सदस्य बबनराव खरात, यांच्यासहअनंता वैद्य, आबा कदम, बाबुराव कायंदे, पंडितराव क्षीरसागर,अजय रोडिया,माऊली गोरे, संदीप झारकंडे, जनार्दन गिराम, दर्शन चौधरी, बबनराव मिसाळ,सुरेश वाघमारे, कुमार रुपवते, दत्ता सुरुंग, काकासाहेब वैद्य, संदीपपाचारे, प्रभाकर खंदारे, संतोष क्षत्रिय, अनिल अंभोरे, जीवन खंडागळे,गणेश लाहोटी, सखावत पठाण, वसीम पठाण, रामेश्वर कुरिल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
०००००००००फोटो ओळी…..८-जालना येथील शिवसेना भवन येथे आयोजित पदाधिकार्यांच्या बैठकीतबोलतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे . व्यासपीठावर शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हाप्रमुख महेश नळगे