vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जवाहर नवोदय विद्यालय; 18 जानेवारीला निवड चाचणी परीक्षा· परीक्षेसाठी भरारी पथकांची नियुक्ती

जवाहर नवोदय विद्यालय; 18 जानेवारीला निवड चाचणी परीक्षा· परीक्षेसाठी भरारी पथकांची नियुक्ती

बुलढाणा, प्रतिनिधी) : जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या 2025 च्या शैक्षणिक प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा दि. 18 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील 40 परीक्षा केन्द्रावर होणार आहे. या परिक्षेत जिल्ह्यातून 12 हजार 073 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

जिल्ह्यातील केद्रांवरील परीक्षा सुरळीत, निपक्षपणे पार पाडण्यासाठी तसेच हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळावे यासाठी परिक्षा दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार होणार नाही, यांची दक्षता घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडुन विशेष भरारी पथक व बैठे पथकांची नियुक्ती केली जाणार असुन सदर पथके विविध केंद्रावर भेटी देणार आहेत. परीक्षा केंन्द्रावर विद्यार्थी किंवा इतर कोणाकडुनही गैरप्रकार करतांना आढळल्यास संबधितांवर नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल, यांची नोंद संबंधीताने घ्यावी. निवड चाचणी परिक्षा शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी परिस्थितीचा आढावा..

राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

पावसाळ्यापूर्वी सांगली पेठ रस्त्याचे काम पूर्ण कराव- जिल्हाधिकारी 

खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते कोलकाता येथे ‘स्वच्छ मोबाईल ॲप’चे भव्य लोकार्पण 🇮🇳📱🧹