vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम;प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी“प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम;प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी“प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

 

बुलढाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दि.15 जुलै पासुन दर सोमवार व शुक्रवारला सकाळी 10 ते 2 या वेळेत “प्रवासी राजा दिन” व दुपारी 3 ते 5 या वेळेत “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येणार आहे. प्रवाशी आणि महामंडळाचे कामगार यांनी याचा लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यारी वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.

बुलडाणा विभागातील प्रत्येक आगारामध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. चिखली आगार येथे शुक्रवार दि. 17 जानेवारी, खामगाव आकार येथे सोमवार दि. 20 जानेवारी, मेहकर येथे शुक्रवार, दि. 24 जानेवारी, मलकापूर येथे सोमवार, दि. 27 जानेवारी, जळगांव जामोद येथे शुक्रवार, दि. 31 जानेवारी व शेगांव येथे सोमवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

माणगाव, तळा व म्हसळा येथील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांमुळेच समाज व देशाचा भविष्यकाळ उज्वल- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातुन बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू,दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनांस आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद)

भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी