vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

सांबरवाडी, येवतेश्वर व अंबाणी येथील जिल्हा परिषद शाळांची* *जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून पहाणी* 

*सांबरवाडी, येवतेश्वर व अंबाणी येथील जिल्हा परिषद शाळांची* *जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून पहाणी*

सातारा प्रतिनिधी : जिल्हास्तरीय शाळा तपासणी समितीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगरपालिकांतर्गत शाळांच्या भौतिक सुविधा तपासणीअंतर्गत सातारा तालुक्यातील, सांबरवाडी, येवतेश्वर व अंबाणी येथील जिल्हा परिषद शाळांना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधा, शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पाहणी प्रसंगी सोबत शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, बांधकाम विभागाचे उप अभियंता आकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिता जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय गिरी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय जाधव, केंद्र प्रमुख छाया कदम आदी उपस्थित होते.

पाहणी दरम्यान, शाळेच्या भौतिक सुविधा जसे की, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, ग्रंथालय आणि खेळाचे मैदान यांची समितीमार्फत तपासणी करण्यात आली. शिक्षणाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी शिक्षकांच्या अध्यापन पध्दती, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शैक्षणिक साहित्याची उपलब्धता यांचे निरीक्षण केले. याशिवाय जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगती व अडचणींबाबत माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.

शासनाकडून शाळांना पूरविण्यात आलेल्या स्मार्ट टी.व्ही. व इतर शैक्षणिक साहित्याच्या वापराबाबत तसेच स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरुस्ती, पुरेशा पाण्याची व्यवस्था इ. बाबत सुधारणा करण्याचा सूचना दिल्या. शैक्षणिक बाबतीतही शिक्षकांना मार्गदर्शनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम भव्य रुपात संपन्न

vishwatmaklokswamivarta

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta

आपत्ती निवारणासाठी आता नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन प्रतिसाद दल (DRF) राहणार सज्ज आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मदतकार्यासाठी विशेष दलाची रचना   

कॉफी विथ कलेक्टर उपक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद**अपयशाने खचू नका, नव्या दमाने उभे राहा; तरुण पिढी देशाचे भविष्य: जिल्हाधिकारी संतोष पाटील*

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

राज्य दहशतवाद विरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २१ ठिकाणी शोधमोहिम, काहीजण चौकशीसाठी ताब्यात.