vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना..

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना..

मुंबई, प्रतिनिधी : भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १७ ते २१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दक्षिणेकडील समुद्री क्षेत्रात वादळी वारे आणि उंच लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

१७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळ, कर्नाटक किनारपट्टी, तसेच लक्षद्वीप, कोमोरिन, मालदीव आणि मन्नारच्या आखाताच्या भागात ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची, तसेच काही ठिकाणी ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी झोत येण्याची शक्यता आहे. या काळात मच्छिमारांना समुद्री भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

२० आणि २१ ऑक्टोबर रोजी या वादळी स्थितीचा प्रभाव आणखी काही भागांपर्यंत वाढण्याची शक्यता असून, पूर्व आणि मध्य अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये ताशी ३५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या सूचनांनुसार, लक्षद्वीप, मालदीव आणि आग्नेय अरबी समुद्र परिसरात उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता असून, समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांनी खबरदारी घ्यावी आणि शक्यतो समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आयएनसीओआयएस यांनीही उंच लाटांचा विशेष इशारा जारी दिला आहे

राज्यशासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व मच्छिमार बांधवांना आवाहन केले आहे की, हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पुढील आदेश मिळेपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याची दक्षता घ्यावी.

00000

संबंधित पोस्ट

जालना महानगरपालिका यांचे जाहीर आवाहन

धारावीतील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती अनिताताई डोईफोडे यांची भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा मुंबई सचिव पदी नियुक्ती

महागणेशोत्सव : २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

vishwatmaklokswamivarta

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५+ देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪