vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत ज्यांचे स्वतःचे वा वडिलोपार्जित घर नाही आणि जे भाडयाने राहतात त्यांना दरमहा ५००० रूपये भाडे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयाच्या ठिकाणी उदा. पुणे, नागपूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या स्वतःचे घर शहरात असलेल्या भाडेकरूंना ३००० रूपये देण्याची मागणी-ब्लॅक पँथर पक्षा ने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

मुंबईत ज्यांचे स्वतःचे वा वडिलोपार्जित घर नाही आणि जे भाडयाने राहतात त्यांना दरमहा ५००० रूपये भाडे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयाच्या ठिकाणी उदा. पुणे, नागपूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या स्वतःचे घर शहरात असलेल्या भाडेकरूंना ३००० रूपये देण्याची मागणी-ब्लॅक पँथर पक्षा ने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी ब्लॅक पँथर (पक्षा ) तफै डॉ. जी. एस. पाटील (मुंबई प्रदेश अध्यक्ष), श्री. सुनील कांबळे मुंबई उपनगर जिल्हा अध्यक्ष,श्री. उदय सावरतकर महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष. अजय म कांबळे मुंबई प्रदेश महासचिव , माया जैस्वाल तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते. श्री. सुनील कांबळे यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना,मुंबईला देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय समाज रोजगारासाठी मुंबईला जातो. तो मुंबईमध्ये रोजगारातून मिळालेल्या तुटपुंज्या पैशावर आपले दैनंदिन जीवन जगत असतो आणि तो आपल्याच राज्यात परप्रांतीय बनतो. राहतो त्याने मिळवलेल्या उत्पन्नातून ना घरभाडे जाते, ना त्याचे भर-संसार चालते मुंबईमध्ये स्वतःचे घर घेणे मध्यमवर्गीयासाठी अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. त्यामुळे तो काही वेळेला फुटपाथवर तर मुंबईत बहुतांशी वेळेला भाडयाने घर घेवून राहतो. त्याला मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेने जीवन जगणे दिवसेंदिवस अत्यंत कठीण बनत चालले आहे. त्यामुळे तो आपल्याच राज्यात परप्रांतीय बनला आहे. त्यामुळे मुंबईत ज्यांचे स्वतःचे वा वडिलोपार्जित घर नाही आणि जे भाडयाने राहतात त्यांना दरमहा ५००० रूपये भाडे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयाच्या ठिकाणी उदा. पुणे, नागपूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या स्वतःचे घर शहरात असलेल्या भाडेकरूंना ३००० रूपये भाडे म्हणून दवावे. तसेच जिल्हयातील भाडेकरूंना ३००० रूपये तसेच सुशिक्षित बेकारांना कंत्राटी भरती बंद होत नाही तोपर्यंत बेकारी भत्ता म्हणून ५००० रूपये तर शेतमजूर यांना दोन एकर जमिन वाटप होईपर्यंत महागाई भत्ता म्हणून ३००० रूपये तर ५० लाखपर्यंतच्या कर्जासाठी सिबीलची अट रद्द करावी ब्लॅक पॅथर पक्षातर्फे मागणी करण्यात येत आहे.

तसेच मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे.जर सरकार आमच्या मागणी कडे लक्ष देत नसाल तर सरकारने आपल्या खर्ची खाली करा असे श्री. सुनील कांबळे यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधला.

संबंधित पोस्ट

मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या-जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

कुटुंब’संस्था मजबूत करणे हाच मानस-रूपाली चाकणकर जनसुनावणीत १५२ तक्रारी निकाली

vishwatmaklokswamivarta

३ वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलीची मुंबई पोलिसांनी वरळी पोलिसांनी काही तासातच सुटका केली.

vishwatmaklokswamivarta

शेगाव येथील टावरी परिवाराकडून मरणोत्तर नेत्रदान…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील तरुणांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन,सामाजिक समता सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन