vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे ग्रँड टूर’ सायकलिंग स्पर्धेचा उद्या लोगो, जर्सी अनावरण समारंभ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती

पुणे ग्रँड टूर’ सायकलिंग स्पर्धेचा उद्या लोगो, जर्सी अनावरण समारंभ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती…

पुणे, प्रतिनिधी भारताच्या सायकलिंग क्षेत्रात नवा इतिहास घडवणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या (UCI लेव्हल २.२ स्टेज रेस) लोगो आणि जर्सी अनावरणाचा भव्य समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत द वेस्टिन हॉटेल, कोरेगाव पार्क येथे उद्या बुधवार, २९ रोजी सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे.

या समारंभात स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, तो भारताच्या सायकलिंग इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला क्रीडा सचिवांसह भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा, तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी पंकज सिंग, मनिंदर पाल सिंग, मनजीत सिंग जी.के., आणि ओंकार सिंह हे मान्यवर उपस्थित राहतील.

आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष व UCI चे उपाध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल (मलेशिया) आणि UCI व्यवस्थापन समिती सदस्या युआन युआन (चीन) यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.

सुमारे १८० मिनिटे चालणाऱ्या या कार्यक्रमाला प्रायोजक, मीडिया प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघ आणि सायकलिंगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. त्यांनी सांगितले की पुणे ग्रँड टूर ही भारतातील पहिली जागतिक दर्जाची मल्टीस्टेज सायकलिंग स्पर्धा ठरणार असून, महाराष्ट्रातील निसर्गरम्य मार्गांवर होणाऱ्या या स्पर्धेतून राज्याची क्रीडा प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचेल.

०००

संबंधित पोस्ट

बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्दमुलांच्या शासकीय निवासी शाळेतील प्रवेश सुरु..

स्वाधार’च्या प्रलंबित अर्जांसाठी विशेष मोहीम;त्रुटी दूर करण्यासाठी १६ मार्चपासून कार्यशाळेचे आयोजन

भरडखोल येथे 137.22 कोटीच्या मत्स्यबंदर विकासकामाचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तर खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली भूमीपूजन संपन्न2 वर्षात विकसित बंदराचे लोकार्पण करणार; मच्छिमार बांधवांची आर्थिक समृद्धी होणार- मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे*

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना प्रजागर्क पदवी

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांची अपार आयडी आणि डिजीलॉकर नोंदणी पूर्ण करण्याचे उच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश जून २०२६ पर्यंत क्रेडिट डेटा अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले पोलिस प्रशिक्षण सभागृह व सीसीटिव्ही कॅमेरे प्रकल्पाचे उदघाटन