पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले
पोलिस प्रशिक्षण सभागृह व सीसीटिव्ही कॅमेरे प्रकल्पाचे उदघाटन
जालना प्रतिनिधी:- पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकारातून व जिल्हा नियोजन समिती निधीतून 4 कोटी 90 लाख रुपये निधीतून जालना शहरातील 48 ठिकाणी 190 सीसीटिव्ही कॅमेरे तसेच पोलिस अधिक्षक कार्यालय येथील पोलिस प्रशिक्षण कक्ष व ग्रेडर टी पॉईंट येथे वाहतूक सिग्नल कामांचा लोकार्पण सोहळा आज राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते पोलिस अधिक्षक कार्यालयात पार पडला. सीएसआर फंडातुन ग्रेडर टी पॉईंट येथे वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत.
यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार हिकमत उढाण, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, कालिका स्टिलचे धनश्याम गोयल, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, भास्कर दानवे यांची उपस्थिती होती.
-*-*-*-*-