vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

मुंबई, प्रतिनिधी : नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन, जनजागृती रॅली, सोशल मीडियावर हॅशटॅगसह जनजागृती मोहीम, कार्यशाळा तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिज्ञा वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. नशामुक्त भारत अभियानाची मुदत नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढविण्यात आली असून या कालावधीत नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

समाजातील सर्व घटकांपर्यंत नशाविरोधी संदेश पोहोचवून “नशामुक्त भारत, खुशहाल भारत” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच एनसीसी स्वयंसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून अंदाजे १० कोटी लोकांपर्यंत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून पोहोचण्याचे उद्दिष्ट आले आहे.

अभियानाच्या प्रसारासाठी “नशामुक्त भारत व खुशहाल भारत” या टॅगलाईनसह तयार केलेल्या मॉस्कॉटचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड स्कॅनर बसवून सामूहिक प्रतिज्ञा घेण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

००

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta

महानगर प्रदेशात महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी अभिनव प्रकल्पाचा प्रस्ताव-छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये #नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली.* मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

नमुंमपा निवडणूक निर्णय अधिकारी यांना धमकावणे ही गंभीर बाब – पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल