vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आष्टी विधानसभा मतदारसंघातील फिश मार्केट उभारणीची कार्यवाही गतिमान करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

आष्टी विधानसभा मतदारसंघातील फिश मार्केट उभारणीची कार्यवाही गतिमान करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

      मुंबई, प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर आधुनिक फिश मार्केट उभारणीस गती द्यावी. याबाबतच्या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याबाबत संबधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही गतीने करावी असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

    मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर आधुनिक फिश मार्केट उभारणीस मंजुरी व निधी उपलब्ध करून देणे संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार सुरेश धस यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी बीड व बीड जिल्ह्यातील स्थानिक स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

        आष्टी विधानसभा मतदारसंघातील तीन नगरपंचायत व सहा ग्रामपंचायतसाठी फिश मार्केट उभारणीचे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे यावेळी आमदार सुरेश धस यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, या फिश मार्केट उभारणी प्रस्ताव आराखड्याची तांत्रिक तपासणी करण्यात यावी. प्रस्तावांची तपासणी करून फिश मार्केट उभारणी संदर्भातील आवश्यक कार्यवाही कालबद्धरित्या पूर्ण करावी. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा जास्तीत जास्त लाभ स्थानिक नागरिकांना मिळेल, याची दक्षता घ्यावी. स्थानिक पातळीवर मत्स्य उत्पादन वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, तसेच फिश मार्केटची वास्तुरचना (आर्किटेक्चर) आधुनिक आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असावी, असेही ते म्हणाले.

        या फिश मार्केटमध्ये दर्जेदार व दीर्घकालीन सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य द्यावे. फिश मार्केट उभारणी करताना नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होईल, याची काळजी घ्यावी, असे निर्देशही मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.0000

संबंधित पोस्ट

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातप्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन आणि विद्यार्थ्यांचा आवाज अभियानाला शहर काँग्रेसची धार महाराष्ट्र राज्य सहप्रभारी रेहाना रियाज चिश्ती यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; युवक-विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

महावितरणच्या जरीदा उपकेंद्रामुळे ५० गावाचा विजेचा प्रश्न सुटला*सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश भुषण गवई यांचे विशेष प्रयत्न..

रि-केवायसी करून खाते अद्यावत करा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्रबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे निर्देश