vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ..

 

राज्य प्रतिनिधी-फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नंबर 17) नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखेस 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी, शर्तीनुसार नाव नोंदणी करण्याकरता उपलब्ध आहेत. या संदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

खाजगी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी विद्यार्थी / शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण होणार !· मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

मेहकर बसस्थानकाचे लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ३० नवीन बसेस लवकर उपलब्ध होणार

संत रोहिदास 650 वी महोत्सव जयंती नियोजन समितीची धारावीत बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत…