vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जेईई, नीटसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी ‘आर्टी’चे प्रशिक्षण केंद्र निवडावे – व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

जेईई, नीटसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी ‘आर्टी’चे प्रशिक्षण केंद्र निवडावे –   व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

मुंबई, प्रतिनिधी: मांतग व तत्सम जातींच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) व नीट (NEET) परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्राची निवड करावी, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

जेईई व नीट प्रशिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी आर्टीने प्रसिद्ध केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. कागदपत्रे पडताळणी पूर्ण केलेल्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी अंतिम निवड करण्यात आली असून अशा विद्यार्थ्यांची यादी आर्टीच्या संकेतस्थळावर लावण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी https://cpetp.barti.in/ या संकेतस्थळावर जाऊन १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रशिक्षण केंद्राची निवड करावी. जेईई व नीटसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण, दरमहा ६ हजार रुपये विद्यावेतन, त्याचबरोबर पुस्तकांसाठी वर्षातून एकवेळ पाच हजार रुपये आणि प्रशिक्षण केंद्रांना त्यांचे शुल्क आर्टीच्या वतीने देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक वारे यांनी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

मुंबई-पुणे मिसिंग लिंक लवकरात लवकर पूर्ण करा- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती

vishwatmaklokswamivarta

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग अनुभव’

संयम व सहनशक्तीची अपूर्व देणगी राजकारणाने मला दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ संपादक विवेक घळसासी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी उलगडले भावविश्व

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग आनंद मेळा’चे आयोज: २८ फेब्रुवारीपर्यंत मेळा राहणार सुरू

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…

vishwatmaklokswamivarta