vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक! पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्याअस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! – सनातन संस्था

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक! पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्याअस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! – सनातन संस्था

 

मुंबई प्रतिनिधी “भारतीय सैन्यदलाने काल रात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि निर्णायक एअर स्ट्राइक करून ती सर्व तळे उध्वस्त केली आहेत. ही केवळ एक सैनिकी कारवाई नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा, सुरक्षिततेचा आणि आत्मगौरवाचा बुलंद शंखनाद आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक यांनी केले.

   ते पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे 26 निरपराध हिंदू पर्यटकांची जी निर्घृण हत्या करण्यात आली, तो हल्ला केवळ काही व्यक्तींवर नव्हता. तो हल्ला संपूर्ण हिंदू समाजावर होता, भारताच्या संस्कृतीवर होता. या क्रौर्याचा जो बदला भारतीय सैन्याने घेतला आहे, तो प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाच्या हृदयाला समाधान देणारा आहे.

   सनातन संस्थेच्या वतीने या निर्णायक कारवाईचे आम्ही मन:पूर्वक स्वागत करतो. हे केवळ सूड नव्हे, ही हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आणि भारताच्या अखंडतेसाठी घेतलेली धाडसी पावले आहेत.

   भारतातील हिंदू आता जागा झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मागणीची दखल घेऊन सरकारनेही चोख प्रतिउत्तर पाकिस्तानला दिले आहे. आता जर पाकिस्तानने वेगळी आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना यापेक्षा अधिक कठोर उत्तर मिळेल, हे भारतीय लष्कर आजच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

    ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ ही केवळ घोषणा नाही. ती हिंदू समाजावरील अन्याविरुद्धचा हिंदूंच्या एकजुटीचा हुंकार आहे. संपूर्ण हिंदू समाज हा भारतीय सैन्याबरोबर एकजुटीने उभा आहे. श्री. अभय वर्तक,प्रवक्ता, सनातन संस्था

,000000

संबंधित पोस्ट

उन्हाळी सुट्टीतही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांना मिळणार अध्ययनाचे धडे..

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

मेळघाटाच्या डोंगरदऱ्यांत रंगला जिल्हा प्रशासनाचा ‘ट्रेकिंग’ अनुभव*ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मोठ्या प्रमाणावर राबवा- सीईओ मिन्नू पी.एम.*ग्राम पंचायतींना लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा… सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta