vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज ठाकरेंनी मित्राचा शब्द पाळला, बाबासाहेबांना दिली अनोखी भेट

राज ठाकरेंनी मित्राचा शब्द पाळला, बाबासाहेबांना दिली अनोखी भेट

प्रतिनिधी :  शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. बाबासाहेबांनी शतक गाठलं आहे. याचनिमित्ताने पुण्यात पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अनेक दिग्गज कलाकार आणि नेत्यांनी हजेरी लावली होती.

बाबासाहेबांसोबतच्या गोड आठवणी यावेळी उपस्थित अनेकांनी सांगितल्या. गायिका आशाताई भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप आमदार आशिष शेलार सह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. बाबासाहेबांचं सुवासिनींच्या हस्ते 99 दिव्यांनी औक्षण करण्यात आलं.आशा भोसले यांच्या हस्ते बाबासाहेबांचा सत्कार होत आहे.

ओंजळ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी देखील बाबासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे बाबासाहेबांसाठी अनोखी भेट राज ठाकरे घेऊन आले होते.

ही भेट खरंतर त्यांच्या मित्राने तयार केली होती. राज ठाकरे यांच्या सांगण्यावरुन चित्रकार विजय राऊत यांनी बाबासाहेबांचं चित्र रेखाटलं. जे त्यांना व्यासपीठावर देण्यात आलं.

संबंधित पोस्ट

विधानपरिषद प्रश्नोत्तर :एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न- मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

नवी दिल्ली राज्यसभा :  विरोधकांच्या निषेधासाठी सत्ताधारी भाजप खासदारांची गांधी पुतळ्याजवळ निदर्शने

vishwatmaklokswamivarta

आज विधानपरिषदेतील निवृत्त पाच सदस्यांचा  निरोप समारंभ

आज दुसऱ्या दिवशीही निवासी डॉक्टरांचा संप सुरुच; मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करणार

वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक संपन्नराज्याच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta