vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात 15 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात 15 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

            सांगली, प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-2025, विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 1 डिसेंबर 2025 ते 15 डिसेंबर 2025 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

          आदेशात म्हटले आहे की, शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

         हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 1 डिसेंबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 15 डिसेंबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत

संबंधित पोस्ट

मोरगावच्या मयुरेश्‍वराप्रमाणे साजरा होणारा.गणेशोत्सवाआधी दोन दिवस सुरू…

vishwatmaklokswamivarta

प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर फलक लावण्यास निर्बंध

राज्य लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी   – आयुक्त डॉ. किरण जाधव…

vishwatmaklokswamivarta

कामगारांना लाभ देण्यासाठी कोणतेही शुल्क नाही;पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता, पाहा कधी दाखल होणार?

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

vishwatmaklokswamivarta