vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारताचे यूएनमधील भाषण:पाकिस्तान स्थित लष्करे तैय्यबा आणि जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनांच्या कारवायांना खतपाणी घातले जात असून दहशतवादाच्या समस्येकडे निवडक दृष्टिकोनातून पाहता येणार नाही.परराष्ट्रमंत्री जयशंकर

भारताचे यूएनमधील भाषण:पाकिस्तान स्थित लष्करे तैय्यबा आणि जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनांच्या कारवायांना खतपाणी घातले जात असून दहशतवादाच्या समस्येकडे निवडक दृष्टिकोनातून पाहता येणार नाही.परराष्ट्रमंत्री जयशंकर

विशेष प्रतिनिधी  :न्यूयॉर्क: पाकिस्तान स्थित लष्करे तैय्यबा आणि जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनांच्या कारवायांना खतपाणी घातले जात असून दहशतवादाच्या समस्येकडे निवडक दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि याबाबत दुटप्पी भाषा करणाऱ्यांविरोधात देखील बोलायचे धाडस असणे गरजेचे असल्याची सडेतोड भूमिका भारताने आज मांडली.संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली आज ‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला दहशतवादी कृत्यांमुळे निर्माण झालेला धोका’ या विषयावर परिसंवाद पार पडला, त्यात बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी उपरोक्त मत मांडले. शेजारील इराकमध्ये इसीसचा प्रसार होऊ लागला असून हक्कानी नेटवर्कच्या कारवायांमुळे जगाच्या चिंता वाढल्या आहेत.

अफगाणिस्तान असो अथवा भारत लष्करे तैय्यबा, जैशे मोहंमद या दहशतवादी संघटना तेथे सक्रिय असल्याचे जयशंकर म्हणाले. सध्या आपण ज्या समस्येला सामोरे जात आहोत तिच्याबाबत सुरक्षा परिषदेला निवडक, सोयीचा विचार करून आत्मसंतुष्ट होता येणार नाही. दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही किंवा त्यांच्या स्त्रोतांकडे देखील डोळेझाक करणे शक्य नाही असेही त्यांनी नमूद केले. अफगाणिस्तानातील ताजा घटनाक्रम जगाची चिंता वाढविणारा असून तेथे तालिबानी सत्ताधीश बनल्याने प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संबंधित पोस्ट

महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ग्रामीण महिलांच्या सबळीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, २०० कोटींचा निधी

पंतप्रधानांना कृषी कायद्याप्रमाणेच माफी मागून तरुणांची आज्ञा पाळावी लागेल, राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण

महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट 

vishwatmaklokswamivarta

वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत एसटी प्रवास; सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न..