vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उन्हाळी भुईमुग पिकासाठी शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उन्हाळी भुईमुग पिकासाठी शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सांगली, प्रतिनिधी : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025 अंतर्गत उन्हाळी भुईमुग पिकासाठी 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाकरिता, जास्तीत जास्त इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

    राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-CS) हे खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारून आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी तयार केले गेले आहे. अभियानांतर्गत पिकाची उत्पादकता वाढ व सुधारित वाणांच्या प्रसारासाठी उन्हाळी हंगाम 2025करिता भुईमूग पिकासाठी हेक्टरी 150 किलो (रक्कम रु. 114 प्रति किलो) शेंगा प्रमाणित बियाणे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाने निवड केलेल्या जिल्ह्यात सांगली जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यात एकूण 500 हे. क्षेत्रावर 100 टक्के अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये भुईमुग पिकाचे 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाण्याचा लाभ सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तालुकानिहाय देण्यात आलेल्या लक्षांकाच्या मर्यादेत द्यावयाचा आहे. यासाठी प्रति लाभार्थी किमान 0.20 हेक्टर व कमाल 1 हेक्टर मर्यादित लाभ देय आहे.

शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांचा भुईमुगासाठी 20 किलो किंवा 30 किलो याप्रमाणे पॅकिंग साईज आहे. शेतकऱ्यांना बियाण्याच्या पॅकिंग साईज नुसार प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येईल. त्यामुळे क्षेत्रानुसार आवश्यक बियाण्यापेक्षा पॅकिंग साईज नुसार अधिकचे बियाणे परीगणित होत असल्यास याकरिताची रक्कम शेतकऱ्यांनी स्वहिश्याने भरावी लागेल. भुईमूग पिकाच्या बियाण्याचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ FarmerAgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्याक्षिके, फ्लेक्झि घटक औषधे आणि खते या टाईल अंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

      शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक (Agristack) वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड लक्षांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे, त्यामुळे या घटकासाठी जास्तीत जास्त इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करून लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

तातडीच्या उपचारामुळे दीड वर्षाच्या अनुजला मिळाले जीवदान**स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे होतेय कौतुक*

फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 25 फायबर ग्लास बोटींचे लोकार्पण..

vishwatmaklokswamivarta

अनाधिकृत नळ शोध मोहिमेंतर्गत लोक अदालतीचे आयोजन”लोकअदालतीमध्‍ये अनाधिकृत नळ धारकांनी रु. 10,000/- ऐवजी रु. 7500/- शुल्‍क भरणा करावा.- आशिमा मित्‍तल, भा.प्र.से. जिल्‍हाधिकारी तथा आयुक्‍त

vishwatmaklokswamivarta

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील,आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

राष्ट्रपती भवनाच्या कॉरिडॉरमध्ये ब्रिटिश व्हाइसरॉयच्या तैलचित्रांच्या जागी आता परमवीर चक्र विजेत्या शूरवीरांची तैलचित्रे..

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवरआर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा