vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

महाविस्तार एआय अप : शेतकऱ्यांसाठी ‘चालते-बोलते कृषी विद्यापीठ’शेतीविषयक कोणताही प्रश्न विचारा, त्वरित मिळेल तज्ज्ञ सल्ला

महाविस्तार एआय अप : शेतकऱ्यांसाठी ‘चालते-बोलते कृषी विद्यापीठ’शेतीविषयक कोणताही प्रश्न विचारा, त्वरित मिळेल तज्ज्ञ सल्ला

नांदेड प्रतिनिधी- शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूक, वेळीच व विश्वासार्ह कृषी माहिती मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाने राज्यभर ‘महाविस्तार एआय’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅप सुरू केले आहे. या अॅपमधून शेतीविषयक सल्ला, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, खतांच्या शिफारशी तसेच बाजारभावाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या सहकार्यातून विकसित करण्यात आलेले हे अॅप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून, त्यामध्ये मराठी भाषेतील चॅटबॉट सुविधा देण्यात आली आहे. शेतकरी या चॅटबॉटवर शेतीसंबंधी कोणताही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे शेतीकामात निश्चितच मोठी मदत होणार आहे.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर उभी राहिलेली आव्हाने लक्षात घेऊन या अॅपच्या माध्यमातून हवामान अंदाज, पीक लागवडीच्या पद्धती, कीड व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था तसेच डीबीटीवरील विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय ऑडिओ व व्हिडीओ स्वरूपातही शेतीपूरक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

महाविस्तार एआय अॅपमध्ये फार्मर आयडी वापरून लॉगिन करता येते. फार्मर आयडी नसल्यास मोबाईल नंबरच्या सहाय्यानेही लॉगिनची सुविधा उपलब्ध आहे. खरीप पेरणीपासून ते शेतीमाल विक्रीपर्यंतची सर्व आवश्यक माहिती या अॅपवर मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.

शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘महाविस्तार एआय’ अॅप जास्तीत जास्त संख्येने डाउनलोड करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी– ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 26 जूनपासून विशेष मोहीम

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा-अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई कर     – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थसंकल्प : ‘बायोफार्मा शक्ती’ उपक्रमासाठी १०,००० कोटींची तरतूद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मानले आभार

vishwatmaklokswamivarta

आरक्षण सोडत – हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

भूजल माहिती भंडार व जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग    विषयावरील कार्यशाळा संपन्न