vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शाहूनगर धारावी झोपडपट्टीत कमला नगर मध्ये सिलेंडरचा स्फोट.

मुंबईतील धारावी शाहूनगर, कमला नगर झोपडपट्टी जस्मिन मिल रोड, मुबारक हॉटेल मागे  सिलेंडरचा स्फोट…,पंधरा जण गंभीर जखमी सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.

मुंबई प्रतिनिधी

माहीम पूर्व शाहूनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीमध्ये कमला नगर झोपडपट्टी येथे मुबारक हॉटेल मागे तिसर्‍या माळ्यावर सिलेंडर घेऊन जात असताना रहिवाशांच्या हातातून सिलेंडर निसटून जमिनीवर आपटल्याने महाभयंकर स्फोट  झाला यामध्ये परिसरातील रहिवासी गंभीर जखमी झाले आहेत सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेले आहेत त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून इतर दहा रहिवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत त्यांचाही उपचार सुरू आहे या स्फोटाच्या वेळी आजूबाजूचे रहिवासी एकत्र जमल्या असल्यामुळे त्यांनाच पोटाचा परिणाम बसला आहे अचानक पणे या स्फोटामुळे आजूबाजूचे रहिवाशी घाबरून गेले आहेत. मुबारक हॉटेल मागे संपूर्ण परिसरात बेकायदेशीरपणे 2, 3 4 माळे बेकायदेशीर बांधकाम आहेत त्याच बेकायदेशीर बांधकाम मुळे काही रहिवाशी तिसर्‍या माळ्यावर ही राहत आहेत, सदर ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आनंद लोंढे, ट्रॅक्टर तोसिफ 4 माळ्याच्या अनाधिकृत बांधकाम करत आहे परंतु भ्रष्ट अधिकारी सगळ्यांना पाठिंबा देत आहे याच मुळे अशा दुर्घटना घडत आहेत मला एकमेव कारण म्हणजे अधिकारी डोळ्याने पाहूनही कारवाई करत नाहीत अशी चर्चा संपूर्ण धारावी भागात आहे

मजबुरीने लोकांना जीवन जगावे लागत आहे. रहिवाशांना प्रत्येक गोष्टीसाठी उतार-चढाव करण्यामुळे अशा दुर्घटना घडल्या जात आहेत या गंभीर बाबीकडे प्रशासनाने पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.सर्व जखमींवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अशी दुर्घटना पुन्हा घडू नये याकरता पालिका प्रशासन पोलीस प्रशासन राज्य सरकार आणि नागरिकांच्या सुविधा याचा विचार करावा आणि त्यांना सोयी सुविधा उपलब्ध होईल असे करावे, परंतु असे जीवघेणे टावर नकोत ज्याच्यामुळे आज ही दुर्घटना घडली आहे, यावेळी स्थानिक पोलिस ठाणे, अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर होते प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनेसनिक रहिवाशांना मदत कार्य करत होते असे परिसरातील समाजसेवक यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

vishwatmaklokswamivarta

2024 नंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजप, ईडीला इशारा…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या सक्रिय सहभागातून रायगड जिल्हा विकासाचे नियोजन* — महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे*स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे कु.तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय” वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर 

vishwatmaklokswamivarta

माणगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या राज्यव्यापी महाअधिवेशन….