vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

2024 नंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजप, ईडीला इशारा…

2024 नंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजप, ईडीला इशारा…

 

मुंबई प्रतिनिधी भाजप आणि केंद्रातील महात्म्यांच्या आधारे ईडी, सीबीआय आणि इतर काही केंद्रीय तपास यंत्रणांच्या ज्या धाडी पडत आहेत ते आम्ही समजू शकतो. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले. कॅबिनेट मंत्र्याला ईडीचे लोक घरी येऊन घेऊन जातात. हे योग्य नाही. पण आम्हाला माहिती आहे हे 2024 पर्यंत चालेल. 2024 नंतर मात्र आम्ही आहोत आणि ते आहेत, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांना दिला आहे.

नवाब मलिक आणि आमच्यासारखे अनेक लोक आहेत. जे सातत्याने सत्याची बाजू मांडत असतात. जे सत्य मांडतात.. खोटारड्यांच्ये मुखवटे फाडून काढतात. त्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते. आजच नवाब मलिक यांना ईडेचे लोक चौकशीला घेऊन गेले. आज भाजपच्या अनेक लोकांविरोधात ईडीकडे तक्रार झाली आहे. भाजपच्या लोकांनीच ती केली आहे. त्यांचे काय झाले? आता आम्ही पुन्हा एकदा ईडीला या तक्रारी आणि प्रकरणे देणार आहोत. आम्हाला माहिती आहे तक्रारी कशा करायच्या असतात, असेही संजय राऊत म्हणाले

एखाद्या गोष्टीची चौकशी होऊ शकते. आम्हाला ते माहिती आहे. पण एका कॅबिनेट मंत्र्याला ईडीचे लोक घरी येऊन घेऊन जातात. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही भाजपच्या काही नेत्यांबाबत ईडीकडे तक्रारी दिल्या आहेत. ईडीने अद्यापही त्यांच्यावर कारवाई केली नाही. एक नोटीसही कोणाला गेली आही. थोडे दिवस जाऊ द्या एकेकाल मी एक्स्पोज करेन. ईडीच्या अधिकाऱ्यांचीही आपण पोलखोल करणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले. 2024 नंतर जे काही होईल त्याचीही तयारी संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवावी, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

 

 

संबंधित पोस्ट

कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी-पोलीस निवडणूक निरीक्षक यांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम,मिशनमोडवर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशमराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; सहभागाचे आवाहन

पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचार:आज मिरझापुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची सभा*