vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

50 बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटपासाठी आज निघणार लॉटरी

50 बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटपासाठी आज निघणार लॉटरी

जालना, प्रतिनिधी- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नोंदणीकृत स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटप करण्याच्या योजनेची जिल्हास्तरीय सोडत (लॉटरी) मंगळवार दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. जालना जिल्ह्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 50 मिनी ट्रॅक्टरचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून पात्र बचतगटांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जाणार आहेत. तरी पात्र ठरलेल्या बचतगटांमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांनी या निवड प्रक्रियेसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले आहे.

समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने तब्बल 90 टक्के अनुदानावर पुरविली जातात. या सुवर्णसंधीसाठी जिल्ह्यातील अनेक बचतगटांनी अर्ज केले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र आणि अपात्र ठरलेल्या बचतगटांची अंतिम यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहात दुपारी 3 वाजता ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. निवडीमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

माजी सैनिकांसाठी भरती

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दात्यांना जुलै 2025 साठीचा जीएसटीआर -3 बी दाखल करण्याच्या अंतिम कालमर्यादेला मुदतवाढ

बहुराष्ट्रीय जबील कंपनीकडून आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण; विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर क्षेत्रात GSTR 3B कर विवरणपत्र पूर्ततेसाठी विशेष मोहीम सुरू

vishwatmaklokswamivarta

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव जिल्ह्यात वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गती

vishwatmaklokswamivarta

वापरात नसलेल्या व कालबाहय फ्रँकिंग मशिन-खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन