vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

ठाणे जिल्ह्यातील  जव्हार पोलिसांचे  माणुसकीचे नाते, वृद्ध आईला केली पोलिसांनी मदत, मुलांना  दिला इशारा : पालनपोषण करा…

ठाणे जिल्ह्यातील  जव्हार पोलिसांचे  माणुसकीचे नाते, वृद्ध आईला केली पोलिसांनी मदत, मुलांना  दिला इशारा : पालनपोषण करा…

जव्हार प्रतिनिधी साभार : जव्हार तालुक्यातील जामसर वडपाडा येथील एका वृद्धेला तिच्या मुलांनी घरातून काढून टाकले होते. तिला राहण्यासाठी घर नव्हते, ही बाब कळताच जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी घरच्यांशी संपर्क साधून वृद्धेला त्यांच्या घरी पाठवले. तसेच वृद्धेला साडी व ब्लाऊज घेऊन माणुसकीचे दर्शन घडवले.

वडपाडा येथील जीवी चैत्या पडेर या ६५ वर्षीय वृद्धेला चार मुले आहेत. ही मुले वृद्ध आईसोबत नेहमी भांडण करत सांभाळ करण्यासाठी टाळाटाळ करीत. त्यांनी आईला घराबाहेर काढल्याने वृद्ध महिला फिरत होती.

छत गेल्यामुळे वृद्धेवर संकट कोसळले होते. अखेर लेंगरे यांनी त्यांच्या दोन मुलांना पोलीस ठाण्यात बोलावून सज्जड दम दिला व तिचा सांभाळ करून पालनपोषण करा, असे सांगितले. तसेच तिला एक नवीन साडी व ब्लाऊज खरेदी करून दिले.

संबंधित पोस्ट

उत्तराखंड | चमोली जिल्ह्यातील पवित्र बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज दुपारी २:५६ वाजता हिवाळ्यासाठी बंद केले जाणार. 

vishwatmaklokswamivarta

देश के निर्माण में, चंद्रपूर मैदान में’ – मा. श्री. सुधीर मुनगंटीवार लक्ष्‍मी म‍ित्‍तल ग्रुपसह 19 सामंजस्‍य करारांवर झाल्‍या स्‍वाक्षरी ‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

पानिपत शौर्य स्मारकासाठीचे भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात- अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया,चला आपण लोक न्यायालयाच्या मार्गाने जावूया.””राष्ट्रीय लोकअदालत” होणार ३ मार्च २०२४ रोजी

vishwatmaklokswamivarta

व्यायामशाळा बांधकामाच्या अनुदान रकमेत वाढ पात्र संस्थांनी लाभ घ्यावा