vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेचा बेकायदा फेरीवाले व बांधकामांवर हातोडा सुरू…

नवी मुंबई महानगरपालिकेचा बेकायदा फेरीवाले व बांधकामांवर हातोडा सुरू…

नवी मुंबई : प्रतिनिधी  : नवी मुंबई  सुनियोजित शहराच्या नियोजनाला बाधा पोहोचवणाऱ्या अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाले यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर  यांनी दिले. कोविड  आणि सणासुदीच्या काळात गैरफायदा घेऊन अनधिकृत  बांधकाम करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचना बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील बेकायदा बांधकामाचा आढावा घेण्यासाठी बांगर यांनी बैठक बोलावली होती. या दरम्यान बांगर यांनी तक्रारीची वाट न पाहता स्वतः कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये सध्या सुरू असलेल्या बांधकामांना बजावलेल्या नोटिसांचा विभागनिहाय आढावा बांगर यांनी घेतला. एकदा नोटीस देऊन बांधकाम निष्कासित केल्यावर एफआयआर दाखल होऊनही जर पुन्हा बांधकाम केले जात असेल, तर ते गंभीरतेने घेऊन आयपीसी कलमाद्वारे गुन्हा दाखल करावा, असे आदेश बांगर यांनी दिले. कायद्याला न जुमानता अशा प्रकारे एकदा कारवाई करूनही पुन्हा व्यवस्थेला गृहीत धरून दुसऱ्यांदा नियमांचा भंग केल्याचा आढळल्यास ही बाब गंभीरतेने घ्या. अशा बांधकामधारकांची स्वतंत्र यादी तयार करून पोलिस आयुक्तांकडे सादर करा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे, तसेच सर्व विभागांचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी व अतिक्रमण विभागाचे सर्व विभागातील अभियंते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू**जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” कार्यान्वित*

vishwatmaklokswamivarta

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात जय्यत तयारी प्रशासन चौखा

शेतकर्‍यांच्या प्रश्नी शिवसेनेचा आवाज दणाणला…शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त करून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत द्या –जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राज्यसभेवर नामनिर्देशित -चारही मान्यवरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या

vishwatmaklokswamivarta

शिवसेना धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे ?

vishwatmaklokswamivarta

जलसमृद्ध गाव अभियान’ लोकचळवळ व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी