
तिसऱ्या लाटेचा लहानग्यांना धोका कमी, 71 टक्के मुलांमध्ये अँटिबॉडीज” मेडिकल एज्युकेशन संस्थेने केला सर्वे
नवी दिल्ली प्रतिनिधी : चंदीगच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चने सिरो सर्वेक्षण केले आहे. या सिरो सर्वेक्षणात लहान मुलांच्या ७१ टक्के नमुन्यांमध्ये अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. पीजीआयएमईआरचे संचालक डॉ. जगत राम यांनी सोमवारी ही माहिती दिली. २७०० लहान मुलांचे सिरो सर्वेक्षण करण्यात आले आहे.
“कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आपण आहोत. चंदीगड PGIMER ने हे सिरो सर्वेक्षण केले आहे. २७०० पैकी ७१ टक्के लहान मुलांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर प्रमाणाबाहेर परिणाम होणार नाही” असे डॉ. जगत राम यांनी या सर्वेक्षणाबद्दल म्हटले आहे. चंदीगडच्या ग्रामीण, शहरी आणि झोपडपट्टी असलेल्या भागातून हे नमुने गोळा करण्यात आले आहेत.
“६९ ते ७३ टक्के लहान मुलांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. सरासरी ७१ टक्के लहान मुलांच्या नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या. लहान मुलांसाठी अजूनतरी लस उपलब्ध नाहीय. त्यामुळे कोविड-१९ च्या संसर्गातूनच या अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होईल, असे वाटत नाही” असे PGIMER चे संचालक डॉ. जगत राम यांनी सांगितल
महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येही करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात ५० ते ७५ टक्के लहान मुलांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचे डॉ. जगत राम यांनी सांगितले. वेगवेगळे सर्वे तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना मोठा फटका बसणार नसल्याचे संकेत देत आहेत, याकडे डॉ. जगत राम यांनी लक्ष वेधले. लोकांनी कोविड नियमांचे पालन केले आणि लसीकरण करुन घेतले, तर तिसरी लाट प्रभावी ठरणार नाही, असे त्यांचे मत आहे.



