vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिक व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिक व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा

पुणे प्रतिनिधी-१३२ इन्फंट्री बटालियन टीए (इको) राजपूत मध्ये माजी सैनिक तसेच (एमओईएफ व सीसी) आणि महाराष्ट्र राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी (अकाली निवृत्तीसह) भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा २० एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे होणार असून भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी २० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसह शारीरिक तंदुरुस्ती चाचणीसाठी उपस्थित राहावे.भरतीसाठी रिक्त पदे जेसीओ-2, सोल्जर जीडी २२, लिपिक-१, सोल्जर चिफ-१, सोल्जर स्टेवार्ड १ असून याकरिता माजी सैनिकांसाठी किमान वयोमर्यादा नाही, मात्र सेवानिवृत्ती/डिस्चार्ज झाल्यापासून ५ वर्षांच्या आत अर्ज करणे आवश्यक राहील, माजी महिला कर्मचाऱ्यांसाठीही समान अट लागू राहील, अशा पात्रता व अटी शर्ती आहेत. माजी सैनिक यांना ५० वर्षे व माजी सैनिक यांना ५५ वर्षांपर्यंत सेवा करता येणार आहे. आवश्यक कागदपत्रे निवृत्तीवेतन आदेश, डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे ८ रंगीत फोटो, शैक्षणिक व जात प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल सतीश दै. हंगे (नि.) यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई धावत्या रेल्वेतून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 5 जणांचा मृत्यू, काही गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

vishwatmaklokswamivarta

पारंपारिक शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड द्यावी: जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे*  *कृषी दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषदेत शेतकरी सन्मान सोहळा संपन्न* 

बारावी जीवशास्त्रची परीक्षा जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रावर सुरळीत : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले· कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती· जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती  जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत निगरानी…

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम – अश्विनी भिडे

शिवजयंतीचे औचित्य साधून कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये बंधारे, गाव तलाव व लघु पाटबंधारे तलावातून गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजपा जालना शहर व पतंजली योग समिती च्या वतीने शहरात विविध ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन