vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

फुलंब्रीतील महिलेची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली;पाणीपुरी व ज्यूस सेंटरमधून स्वावलंबनाकडे वाटचाल

फुलंब्रीतील महिलेची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली;पाणीपुरी व ज्यूस सेंटरमधून स्वावलंबनाकडे वाटचाल

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- जिद्द, मेहनत आणि बचत गटाच्या माध्यमातून उभारलेला व्यवसाय यामुळे फुलंब्री तालुक्यातील सुनिता संतोष शिंदे या यशस्वी उद्योजिका म्हणून समोर आल्या आहेत. स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करत इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

सुनिता शिंदे या फुलंब्री येथील गृहिणी. २०१९ मध्ये त्यांनी स्वामी समर्थ महिला बचत गटात प्रवेश घेतला. बचतीबरोबरच व्यवसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आम्रपाली लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशिक्षण व चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. यानंतर त्यांनी बँक कर्जाच्या सहाय्याने रेडीमेड कपड्यांचे दुकान सुरू केले.

दरम्यान, २०२० मध्ये नव्या संधींचा शोध घेत त्यांनी पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. बचत गटातून ५० हजार रुपयांचे कर्ज घेऊन पाणीपुरी गाडी सुरू केली. सुरुवातीला रोज १,००० ते १,५०० रुपयांची उलाढाल होत होती. पुढे वैयक्तिक बँक कर्जाच्या माध्यमातून सुमारे २ लाख रुपयांचे भांडवल उभारून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आणि ज्यूस सेंटरही सुरू केले.

सध्या त्यांच्या पाणीपुरी व ज्यूस व्यवसायातून दररोज २,५०० ते ३,००० रुपयांची उलाढाल होत असून एकूण मासिक उलाढाल २ ते अडीच लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सर्व खर्च वजा जाता सुमारे १ लाख रुपयांपर्यंत निव्वळ बचत होत आहे. त्यांच्या या व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असून मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी भक्कम आधार निर्माण केला आहे.

खुलताबाद रोड, फुलंब्री येथे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत त्यांचा पाणीपुरी व ज्यूस सेंटर व्यवसाय सुरू असतो. विशेष म्हणजे, त्यांनी बचत गटातील दोन महिलांना रोजंदारीवर रोजगार उपलब्ध करून दिला असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीतही त्यांनी हातभार लावला आहे.

प्रत्येक महिलांनी जिद्द ठेवून व्यवसाय सुरू करावा. बचत गट हा महिलांसाठी मोठा आधार ठरू शकतो,” असा संदेश सुनिता शिंदे यांनी दिला आहे. त्यांच्या यशोगाथेमुळे फुलंब्री तालुक्यातील अनेक महिलांना उद्योजकतेची प्रेरणा मिळत आहे.

०००००

संबंधित पोस्ट

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचे कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत…

vishwatmaklokswamivarta

यशकथा:तालसवाड्यातील महिला उद्योजिकेची भरारी: ‘माउली दुग्ध व्यवसाय’ ठरतोय यशाचा नवा मार्ग

इ टी एज एससीएम फेस्ट 2025: ‘संकल्प से सिद्धि इन्फ्रास्ट्रक्चर ऑनर’ ने आयडब्ल्यूएआयच्या जल मार्ग विकास प्रकल्पाला गौरव

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्सची उद्या व्यापार परिषद२८ वा वर्धापन दिननिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार