vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

सातारा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई; शिरवळमध्ये मुद्देमालासह हातभट्टी दारू जप्त

सातारा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई; शिरवळमध्ये मुद्देमालासह हातभट्टी दारू जप्त

सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असून, भरारी पथक सातारा यांनी शिरवळ (ता. खंडाळा) येथे धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत हातभट्टी दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी गाडी असा एकूण ४ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी शिरवळ परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार पथकाने सापळा रचून मारुती सुझुकी वॅगनआर या गाडीची तपासणी केली. या तपासणीत ३५ लिटर क्षमतेचे एकूण १२ प्लास्टिक कॅन मिळून आले, ज्यात ४२० लिटर हातभट्टी दारू आढळून आली.

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (अ) (ई) नुसार गुन्हा रजिस्टर नं. १२७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या पथकात निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, सागर आवळे, अजित रसाळ, आबासाहेब जानकर, अरुण जाधव आणि बाळासो पांचुदे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण करत आहेत.

जिल्ह्यामध्ये कुठेही बनावट दारू किंवा हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री अथवा वाहतूक होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी,” असे आवाहन अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

लाचेच्या तक्रारीसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक जारी..

नव्या मुंबईतील धक्कादायक बातमी -नवी मुंबईतील तळोजा येथे २.५ वर्षांच्या हर्षिका शर्माची तिच्या शेजारीनेच केली हत्या…

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांनी केला आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश! 

vishwatmaklokswamivarta

अंधेरी पोलिसांचे मोठे यश – वृद्धांना फसवणारा दुष्ट आरोपी नाशिक येथून अटक, ६ प्रकरणे उलगडली

साकीनाका येथे बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश, फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक*

vishwatmaklokswamivarta

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई